Diwali Skincare Saam TV
लाईफस्टाईल

Diwali Skincare : दिवाळीत सुंदर दिसणे पडू शकते महागात; मेकअपमुळे होणाऱ्या स्किन प्रॉब्लेमपासून वाचण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Diwali Skin Care Tips : चेहऱ्यावर नॅचरल ग्लो रहावा तसेच मेकअप केल्याने स्किन खराब होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीत प्रत्येक दिवशी आपण नवीन कपडे परिधान करतो. नवीन कपड्यांसह सुंदर दागिने आणि रोजचा नवीन मेकअप केला जातो. त्यामुळे स्किन खराब होण्याची शक्यता असते. स्किनवर होणाऱ्या समस्यांपासून वाचण्यासाठी काही खास टिप्स दररोज फॉलो करणे गरजेचे आहे. आम्ही सांगितलेल्या या टीप्स फॉलो केल्याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा डाग पडणे या समस्या जाणवणार नाहीत.

फेसवॉशनंतर टोनर वापरा

फेसवॉश केल्यानंतर प्रत्येकाने टोनर वापरले पाहिजे. अनेक मुलींच्या चेहऱ्यावर ओपन फोर्स असतात. फेसवॉशनंतर लगेच टोनर वापरल्याने चेहऱ्यावरील ओपन फोर्स कमी होतात. मेकअप करताना सर्व प्रोडक्ट स्किनमध्ये जाते. त्यामुळे ओपन फोर्स बंद करण्यासाठी फेसवॉशनंतर आठवणीने टोनर वापरा.

प्रायमर वापरा

चेहऱ्यावर बारीक पुरळ असल्याने मेकअप केल्यावर चेहऱ्यावर दाणे आल्यासारखे वाटते. चेहऱ्यावर दाणे आल्यासारखे दिसू नये म्हणून काही खास काळजी घेतली पाहिजे. यामध्ये तुम्ही चेहऱ्यावर प्रायमर लावू शकता. प्रायमरने स्किन सॉफ्ट होते आणि चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो.

नॅचरल प्रोडक्ट

चेहऱ्यावर जास्त मेकअप करत असाल तर शक्यतो नॅचरल आणि हलके प्रोडस्क्ट निवडा. त्याने स्किन खराब होणार नाही. नॅचरल प्रोडक्ट वापरल्याने स्किनवर डाग येत नाहीत. तसेच मेकअपमुळे चेहऱ्यावर पिंपल्स सुद्धा येत नाहीत.

स्वच्छ ब्रश वापरा

तुम्ही चेहऱ्यावर काही प्रोडक्ट अप्लाय करता तेव्हा ते हाताने लावू नका. मेकअपचे सर्व प्रोडक्ट लावताना कायम ब्रशचा वापर करा. ब्रश नेहमी स्वच्छ असावा. अनेक मुली वारंवार वापरलेला ब्रश वापरतात. त्यामुळे तुम्ही ब्रश नेहमी स्वच्छ धुवून घ्या. ब्रश पूर्ण सुकलेला असावा त्यात ओलावा राहिल्यास चेहरा खराब होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyayak Patani News : कारंजामधून भाजपला धक्का, ज्ञायक पाटणींचा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश

Sharad Pawar : शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; 'या' 9 उमेदवारांना मिळणार संधी | Video

Maharashtra News Live Updates : पुणे कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसकडून रमेश बागवे यांना उमेदवारी

Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा विधानसभेसाठी पेच कायम; महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेना

VIDEO : मित्रपक्षानेच दिला भाजपला धक्का? माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी शिंदे गटात करणार प्रवेश

SCROLL FOR NEXT