Diwali 2025 saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2025: 'या' ६ गोष्टी न घेता दिवाळी पूर्ण नाही! लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा सोपा मार्ग

Diwali Lakshmi Pujan: दिवाळी (Diwali) हा प्रकाशाचा आणि समृद्धीचा सण आहे. या पाच दिवसांच्या उत्सवात लक्ष्मी पूजनाला (Lakshmi Pujan) सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी वास करण्यासाठी येते, अशी धार्मिक मान्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या एक दिव्यांचा सण असून जो चांगुलपणावर वाईटाचे विजय दर्शवतो. अशा वेळी प्रश्न पडतो की दिवाळीला असं काय खरेदी करावं की माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो.

दिवाळीला सोनं-चांदी खरेदी करण्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व फार मोठं आहे. याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद, संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य याचे प्रतीक मानलं जातं. त्याचप्रमाणे हे आर्थिक दृष्ट्या सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. कारण काळानुसार त्याची किंमत वाढते आणि महागाईपासून संरक्षण मिळतं. ही परंपरा भगवान धन्वंतरि आणि देवी लक्ष्मीशी निगडित आहे, जे आरोग्य आणि धनाचे देव आहेत.

झाडूची खरेदी

दिवाळीला झाडू खरेदी करणं ही माता लक्ष्मीला घरात आकर्षित करण्याची आणि संपत्ती आणण्याची एक पद्धत आहे. असं मानलं जातं की, झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती वाढते, गरिबी दूर होते आणि लक्ष्मींचा कायमस्वरूपी वास होतो. हे घर स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणीच राहतं.

दिव्यांचीही खरेदी करा

दिवाळीला दिवं लावणं हे अंधकारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञान आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतं. हे माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि घरात सुख-समृद्धी आणते. दिवाळीच्या पारंपरिक कथांनुसार, भगवान राम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी आनंदाने दिवे लावले होते. दिवे खरेदी करणं फक्त धार्मिक महत्त्वाचं नाही, तर ही परंपरा टिकवण्यास आणि मूर्तिकार किंवा मातीच्या कामाशी संबंधित लोकांच्या उपजीविकेसाठीही मदत करते.

लक्ष्मी-गणेशाच्या मूर्तीची खरेदी

दिवाळीला लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती खरेदी करणं सुख-समृद्धी आणि बुद्धी मिळवण्याचं प्रतीक आहे. लक्ष्मी धन-वैभवाच्या देवता आहेत तर गणेश बुद्धीचे देव आहेत. मूर्ती खरेदी करताना लक्षात ठेवा की, त्यांना वेगळे ठेवावं. गणेशाची सोंड डावीकडे वाकलेली असावी आणि हातात लाडू किंवा मोदक असावा. तर लक्ष्मी कमळावर विराजमान असाव्यात.

लाह्या-बताशे खरेदी करा

दिवाळीला लाह्या-बताशे खरेदी करणं ही धार्मिक परंपरा, धन-धान्याचे आशीर्वाद आणि नात्यांमध्ये गोडवा टिकवण्याचं प्रतीक मानलं जातं. हे देवी लक्ष्मीला अर्पण केल्यास संपत्ती मिळते आणि हे शुक्र ग्रहाशीही संबंधित आहे.

नारळाची खरेदी

दिवाळीला नारळ खरेदी करणंही शुभ मानले जातं. कारण हे संपत्ती, सौभाग्य आणि सुख-समृद्धी आणते. नारळ देवी-देवता आणि शुभ गोष्टींचं प्रतीक आहे. पूजा करताना नारळ अर्पण केल्यास धन-धान्यात वाढ होते आणि तिजोरीत ठेवलं तर आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात स्थायी समृद्धी टिकून राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT