
चाकण एमआयडीसी परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीविरोधात सर्वपक्षीय मोर्चा .
नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांनी चाकण ते आकुर्डी मोर्चा काढला.
प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत तात्काळ उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
हा सर्वपक्षीय एल्गार आहे पुणे जिल्ह्यातील चाकणमधील वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी. नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येत चाकण ते आकुर्डी पायी मोर्चा काढलाय.खरंतर अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी चाकण एमआयडीसीसाठी फास बनलीय. या वाहतूक कोंडीमुळे चाकणमधील नागरिकांचे मोठे हाल होतात. आता PMRDA प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच चाकण एमआयडीसीत वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय. मात्र चाकणमध्ये वाहतूक कोंडी का होत आहे? पाहूयात
नाशिक फाटा-चांडोली मार्गाचं भूसंपादन रखडलं
चाकणच्या उड्डाणपुलाचं काम सुरू होईना
मोशी-चांडोली दरम्यान भुयारी, उड्डाणपूल होईना
पुणे-नाशिक महामार्गाचं विस्तारीकरण रखडलं
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचं काम रखडलं
खरंतर गेल्या 10 वर्षात वाहतूक कोंडीमुळे चाकण एमआयडीसीतील 50 पेक्षा जास्त कंपन्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये गेल्या आहेत... त्यानंतर खुद्द अजित पवारांनी मैदानात उतरत वाहतूक कोंडीवरुन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अजित पवारांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना झापल्यानंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही. त्यावरुन अमोल कोल्हेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाहतूक कोंडीसारखा जनहिताचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांनी उचललाय. मात्र आतातरी वाहतूक कोंडीतून खेड, चाकण परिसरातील नागरिकांची सुटका होणार का? आणि सरकार वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्रात सिंगापूर आणि टोकियोसारखी आदर्श व्यवस्था निर्माण केली जाणार का? याकडे वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या पुणेकरांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.