
Nilesh Ghaiwal Sachin Ghaiwal Ram Shinde : कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ पोलिसांना चुना लावून परदेशात पसार झाला. त्यानंतर निलेश घायवळचा भाऊ गुंड सचिन घायवळला थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्रपरवाना दिल्याचं समोर आलंय.. मात्र आता या प्रकरणात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंची एण्ट्री झालीय. राम शिंदेंच्या शिफारशीमुळेच मकोकातील आरोपी सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिला गेल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय...
एवढंच नाही तर सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या योगेश कदमांचा बचाव करताना रामदास कदमांनी अप्रत्यक्षपणे थेट विधीमंडळातील सर्वोच्च पद असलेल्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंकडे बोट दाखवलंय...
दरम्यान या सगळ्या आरोपप्रत्यारोपानंतर लगेचच काही व्हीडीओ समोर आले. यात विधानसभा निवडणुकीत निलेश घायवळ राम शिंदेंसाठी प्रचार करताना दिसत आहे. राम शिंदेंच घायवळ कनेक्शन समोर आल्यानंतर भाजपनेही सचिन घायवळचे रोहित पवारासोबतचे फोटो ट्वीट करुन ये रिश्ता क्या कहेलाता है, असा सवाल केलाय...
खरंतर 1999 पासून निलेश घायवळ आणि सचिन घायवळवर हत्या, गोळीबार, गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध, मकोका अशा वेगवेगळ्या कलमांखाली 24 गुन्हे दाखल आहेत.. निलेश घायवळला त्याच्या गँगमध्ये बॉस तर सचिन घायवळला सर म्हणून ओळखलं जातं..एवढंच नाही तर घायवळची पुणे, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यात 40 ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे..
कायदे कऱण्याची जबाबदारी असलेल्या कायदेमंडळाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती आणि सदस्यच जर अशा प्रकारे गुंडांना पाठिशी घालत असतील तर महाराष्ट्राची अवस्था बिहारपेक्षा बत्तर व्हायला वेळ लागणार नाही...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.