Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Construction Worker Falls from 13 Floor Building : चेंबूर पूर्वेतील ओम साई ग्रुपच्या बांधकाम साइटवर मोठी दुर्घटना घडलीय. १३ व्या मजल्यावरून पडून एका ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर तीस तास उलटूनही बिल्डर किंवा कंत्राटदाराविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाहीये.
Construction Worker Falls from  13 Floor Building
Protesters gather outside Om Sai Group office in Chembur after a worker died falling from the 13th floor of an under-construction building.file photo
Published On
Summary
  • चेंबूर (पूर्व) येथे तेराव्या मजल्यावरून पडून ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे.

  • ही दुर्घटना ओम साई ग्रुपच्या बांधकाम प्रकल्पात घडली.

  • अपघातानंतर तीस तासांनंतरही पोलिसांनी कोणतीही FIR दाखल करण्यात आली नाहीये.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

चेंबूर (पूर्व) येथील विकासक ओम साई ग्रुपच्या बांधकाम प्रकल्पात मोठी दुर्घटना घडलीय. इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून एका कामगाराचा मृत्यू झालाय. यादप्पा कावली (वय अंदाजे ३५) असे या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना काल दुपारी तीनच्या सुमारास घडली असून, तीस तास उलटूनही चेंबूर पोलिसांनी विकासक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केलेला नाही, ही गंभीर बाब आहे.

यामुळे संतापलेल्या मृताच्या नातेवाईकांसह इतर कामगारांनी विकासकाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, अपघातानंतर विकासक आणि कंत्राटदार दोघेही फरार झाले असून, पोलीस त्यांना वाचवत आहेत.

मृत कामगाराच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई आणि जबाबदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी आणि कामगार संघटनांनी केला आहे.

स्थानिकांच्या मते, अशा अपघातांनंतरही बांधकाम स्थळांवरील सुरक्षा नियमांचे उल्लंघन थांबत नाही, आणि कामगारांचे जीव धोक्यात घातले जात आहेत. आता या प्रकरणात एफआयआर नोंदवून दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com