ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशभरात सध्या गणेशोत्सवाची मोठ्या जल्लोषात तयारी केली जात आहे. याबरोबरच वर्षातील मोठे सण देखील लवकरच येणार आहे, यांची तारीख, वार आणि शुभ मुहूर्त कधी आहे, जाणून घ्या.
दरवर्षी अश्विन शुक्ल दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचे पुतळे जाळून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक साजरा केले जाते.यावर्षी दसरा २ ऑक्टोबर रोजी येत आहे.
धनत्रोयदशी हा सण १८ ऑक्टोबर २०२५, शनिवारी येत आहे. धनत्रोयदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ०७:१६ पासून ते रात्री ०८:२० पर्यंत चालेल. या दिवशी भगवान कुबेर आणि धन्वंतरी यांच्या पूजेसह नवीन वस्तू किंवा सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे.
नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी, ही उत्तर भारतात ती हनुमान जयंती म्हणूनही साजरी केली जाते. यावेळी हा सण रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी येत आहे. मान्यतेनुसार, या दिवशी दिवा लावल्याने नरकातून मुक्तता होते.
यावर्षी दिवाळी २० ऑक्टोबर २०२५, सोमवार रोजी येत आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त संध्याकाळी ०७:०८ ते ०८:१८ पर्यंत असेल. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश, देवी काली आणि कुबेर देव यांची विशेष पूजा केली जाते.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट हा सण साजरा केला जातो. यावेळी हा सण २२ ऑक्टोबर २०२५, बुधवार रोजी साजरा केला जाईल.
भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक आहे. यावर्षी हा सण २३ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी येईल. ओवाळणीचा शुभ काळ दुपारी ०१:१३ ते ०३:२८ पर्यंत असेल.