WhatsApp Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर तुमची 'ही' एक चूक पडेल महागात, रिकामं होईल बँक अकाउंट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. कालांतराने या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक नवीन फिचर्स अॅड करण्यात आले.

WhatsApp | yandex

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर

नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर स्क्रीन मिररिंग लॉंच करण्यात आले. या फीचरमुळे तुम्हीही फसवणुकीचे बळी होऊ शकता.

Whatsapp | freepik

व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग

व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन फिचर म्हणजे स्क्रीन मिररिंग. याचा वापर करुन युजर्स एक दुसऱ्यांची स्क्रीन मिरर करु शकतात.

Whatsapp | freepik

स्कॅमर्स

फ्रॉड करताना, स्कॅमर्स प्रथम तुम्हाला फोन करतात. ते बँक, आधार किंवा इतर कोणत्याही एजन्सीच्या नावाने कॉल करतात. स्कॅमर्स प्रथम तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात. जशी एखादी व्यक्ती त्यांच्यावर विश्वास ठेवते तेव्हा ते फसवणुकीची प्रक्रिया पुढे नेतात.

WhatsApp | yandex

व्हॉट्सअ‍ॅप कॉल

स्कॅमर्स तुम्हाला WhatsApp वर व्हिडिओ कॉल करतील आणि तुमची स्क्रीन शेअर करण्यास सांगतील. ते तुम्हाला स्क्रीन मिररिंगच्या फिचरबद्दल सांगणार नाहीत, याउलट फसवून स्वतः सेटिंग चालू करतील.

WhatsApp | google

बँक अकाउंट

तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करताच, त्यांना तुमच्या फोनच्या सर्व डेटाचा अॅक्सेस मिळतो. समजा, स्क्रीन शेअर केल्यानंतर, तुम्ही बँकिंग अॅप उघडले आणि तुमचे क्रेडेन्शियल्स एंटर केले, तर स्कॅमरला ते कळेल.

WhatsApp | Saam TV

युजरनेम आणि पासवर्ड

तुमचा पासवर्ड आणि युजरनेम जाणून घेतल्यानंतर, स्कॅमर तुमचे खाते रिकामे करेल. तसेच स्कॅमर तुम्हाला थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करायला देखील लावू शकतात.

Whatsapp | freepik

NEXT: मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते का?

woman | yandex
येथे क्लिक करा