
निलेश घायवळ प्रकरणाचे प्रचारसमयी आलेल्या फोटो-व्हिडिओमुळे राजकीय वाद पेटला.
रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
भाजपच्या एका नेत्याने रोहित पवारांचा फोटो शेअर केल्यावर वाद वाढलाय.
भाजप खालच्या पातळीत राजकारण करत आहे. आई राजकरणात नसून त्यांनी भाजप त्यांच्यावरून माझ्यावर टीका करत आहे. 'आईला कशाला मध्ये आणता. तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची,' असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. निलेश घायवळ प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांना घेरलंय. विधानसभेच्या प्रचारात अधिकृतपणे निलेश घायवळ शिंदेचा प्रचार करत होते. त्याचे व्हिडिओ, फोटो, भाषणे आहेत असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवारांनी केला होता.
त्यानंतर भाजप प्रवक्त्यांनी रोहित पवार यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यावरून रोहित पवारांनी भाजपला डिवचलं आहे. माझी आई राजकारणात नाही. भाजप कोणत्या लेव्हलला जात आहे. तिला काही कळत नाही. विरोधक जरी तिच्या बाजूला उभा राहिला तर तिच्या लक्षात येणार नाही. भाजपाने माझ्याशी लढावे. आईला समोर करून गलिच्छ राजकारण करीत आहे. आईला कशाला मध्ये आणता. तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची.
योगेश कदम यांनी बंदुकीचे लायसन्स कुणाच्या सांगण्यावरून दिले. हे आज रामदास कदम यांनीच स्पष्ट केले आहे. मी आधीच बोललो होतो सभापती राम शिंदे यांच्या सांगण्यावरून लायसन्स दिले आहे. त्याला आज रामदास कदम यांनी दुजोरा दिला आहे. असं रोहित पवार यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केलीय.
शस्त्र परवाना किंवा पासपोर्ट काढायचा असेल तर किती तरी अधिकाऱ्यांना भेटावे लागते. तरीही बऱ्याचदा शस्त्र परवाना आणि पासपोर्ट मिळत नसते. हा सर्वसामान्यांना अनुभव आहे. गुंड निलेश घायवळ जो खूनाच्या आरोपात आहे. त्याला पासपोर्ट मिळतो, व्हिसा मिळतो हे राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाहीये. गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिला जात असेल तर त्याचीही पार्श्वभूमीवर तपासली जाते.
त्यामुळे वरदहस्त नक्कीच आहे. यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असू शकतात, असा आरोप रोहित पवार यांनी गुरुवारी केला होता. विधानसभेच्या प्रचारात अधिकृतपणे निलेश घायवळ शिंदेंचा प्रचार करत होते. त्याचे व्हिडिओ, फोटो, भाषणे असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.