Butter Chakli Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Butter Chakli Recipe : रेशनच्या तांदळापासून बनवा बटर चकली, महिनाभर राहिल कुरकुरीत; पाहा रेसिपी

How To Make Butter Chakli Recipe : कधी चुकते तर कधी तेलात फुटते त्यामुळे हल्ली चकलीसाठी रेडीमेड पर्याय सगळे निवडतात.

कोमल दामुद्रे

Diwali Special Recipe :

दिवाळी म्हटलं की, सगळीकडे पाहायाला मिळतो लख्ख प्रकाश, रांगोळ्या, पणत्या आणि चमचमीत फराळ. दिवाळीत चिवडा लाडूच्या पदार्थ चकली ही हवीच. त्याशिवाय फराळाची मज्जा पूर्ण होत नाही.

परंतु, चकली करताना अनेकांच्या नाकी नऊ येतात. कधी चुकते तर कधी तेलात फुटते त्यामुळे हल्ली चकलीसाठी रेडीमेड पर्याय सगळे निवडतात. घरगुती चकली बनवताना बरेचदा ती इतकी कडक होते की, दात दुखू लागतात. पण जर तुम्हाला खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली बनवायची असेल तर रेसिपी पाहा.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • तांदळाचे पीठ / Rice flour - 2 Cup - 300 gm

  • पाणी / Water - 2 Cup

  • कलौंजी / Kalonji - ½ Spoon

  • मीठ / Salt - ½ Spoon

  • बटर ( लोणी ) / Butter - 25/30 gm

  • तेल (Oil) / Cooking oil - चकल्या तळण्याकरिता

2. कृती

  • सर्वप्रथम कढई घेऊन त्यात २ कप पाणी (Water) घाला आणि गरम करुन त्यात मीठ, कलौंजी आणि बटर घालून ढवळून घ्या.

  • त्यात २ कप तांदळाचे पीठ घालून लाकडी चमच्याने हळूहळू ढवळून घ्या. त्यानंतर तयार पीठाला वाफ काढून घ्या.

  • वाफवलेले पीठ भांड्यात घेऊन तांब्याच्या सहाय्याने मळून घ्या. त्यात पुन्हा बटर घालून हाताने मळून घ्या.

  • नंतर चकलीच्या साच्यामध्ये पीठाचा गोळा भरा. चकली पाडताना ताटाच्या मागच्या बाजूला बटर लावून घ्या. चकली व्यवस्थित गोल आकारात तयार करा.

  • त्यानंतर कढईत तेल गरम करुन घ्या. त्यात चकलीचे पीठ थोड्या प्रमाणात घाला. ज्यामुळे तेल गरम झाले की, नाही याचा अंदाज येईल.

  • त्यात चकली घालून तळून घ्या. चाळणीच्या खाली भांडे ठेवून त्यात सगळ्या चकल्या ठेवा. ज्यामुळे चकलीमधील अतिरिक्त तेल निघून जाईल.

  • वरील साहित्यात साधारणत: २० ते २५ कुरकुरीत चकल्या तयार होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT