Diwali Health Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Health : दिवाळीचा खमंग फराळ कशात तळाल, तुपात की तेलात? जाणून घ्या

Disease : मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढते कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आजार हे प्रमाणापेक्षा जास्त तेलाचे सेवन केल्यामुळे होते.

कोमल दामुद्रे

Which Oil Best For Diwali Faral :

दिवाळी म्हटलं की, दिव्यांची आरास, रोशनाई, मिठाई आणि खमंग असा फराळ. दिवाळीच्या या काळात घरातील प्रत्येकाला कोणता ना कोणता पदार्थ आवडत असतो. त्यासाठी आपल्याला प्रत्येक पदार्थ बनवावा देखील लागतो.

हल्ली प्रत्येकाला जिभेचे चोचले पुरवायचे आहे परंतु, तेही आरोग्याची काळजी घेऊन. त्यासाठी काही लोक फक्त चवीपुरता फराळ चाखतात. बरेचदा फराळ बनवून झाल्यानंतर डब्यात किंवा ठेवलेल्या भांड्याला चपचपीत तेल चिकटून राहाते. मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढते कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आजार हे प्रमाणापेक्षा जास्त तेलाचे सेवन केल्यामुळे होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक गृहिणींना प्रश्न असतो की, दिवाळीचा फराळ (Faral) नेमका कशात तळावा तुपात की, तेलात? कोणते तेल आरोग्यासाठी अधिक चांगले आहे. घराघरात दिवाळीच्या फराळाची लगबग पाहायला मिळत आहे. तळणासाठी वापरले जाणारे तेल आरोग्यावर (Health) परिणाम तर नाही करणार ना या गोष्टींची चिंता देखील सतावते आहे. परंतु आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे आरोग्याची काळजी घेता येईल.

हिवाळा आणि दिवाळी या दोन्ही गोष्टींचा विचार करुन शरीराल ऊर्जा देणारे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ बनवताना तेलाचे प्रमाण, पदार्थ, डाळी, पोहे किती असायला हवे जाणून घेऊया.

  • फराळासाठी तेल वापरताना ते अति गरम करणे टाळा. ठराविक प्रमाणात पदार्थ तयार करा.

  • तळणासाठी वापरले जाणारे तेल हे उच्च उष्मांक असणारे हवे. यात खोबरेल तेल, सूर्यफुलाचे तेल (Oil) किंवा तूप यांचा वापर करु शकतो.

  • तेल गरम करताना त्याचा योग्य तो अंदाज घ्या. तेल काळे होईपर्यंत किंवा धूर निघेपर्यंत गरम करु नका.

  • वापरलेल्या तेलाला थंड झाल्यानंतर गाळून घ्या. त्या तेलाचा वापर दिव्यांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर कारने घेतला अचानक पेट

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT