Weight Loss Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : फराळ खाऊन पोट सुटलंय? वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर

Home Remedies For Weight Loss : वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.

कोमल दामुद्रे

Detox Drink For Weight Loss :

दिवाळी म्हटलं की, फराळाची चव चाखल्याशिवाय सणाचा आनंद द्विगुणित होत नाही. सणासुदीच्या काळात साखर आणि कार्बोहायड्रेट्सच्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयविकाराच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वजनही अतिप्रमाणात वाढते.

कितीही प्रयत्न केले तरी वाढणाऱ्या वजनाला नियंत्रणात ठेवता येत नाही. परंतु, जर तुम्हालाही तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वजन कमी करण्यासाठी भरपूर पोषकतत्व असलेले आले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते. आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies) म्हणून वापरले जाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी देखील मदत करु शकते. वजन नियंत्रित करण्यासाठी आल्याचा वापर केला जाऊ शकतो.

1. आल्याचा चहा

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आल्याचा चहा फायदेशीर ठरु शकते. वजन कमी करण्यासाठी नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळी आल्याचा (Ginger) चहा पिऊ शकता. या चहामध्ये लिंबाचा रसही मिसळून पिऊ शकता. जे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.

2. आले आणि लिंबू पाणी

वजन कमी करण्यासाठी बरेचदा लोक सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करतात. वजन कमी करण्याच्या आहारात आले आणि लिंबू पाणी पिऊ शकता. यासाठी गरम पाण्यात आले आणि लिंबाचा रस मिसळून रोज सकाळी डिटॉक्स ड्रिंक म्हणून पिऊ शकता.

3. स्मूदी

वजन कमी (Weight loss tips) करण्यासाठी तुम्ही आल्याचा स्मूदी देखील वापरु शकता. यासाठी फळे, भाज्या आणि आल्याचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे पोट भरलेले राहाते. तसेच वजन कमी होण्यासाठी मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT