Diwali 2022 : दिवाळी आली की, गोडाधोडाचे पदार्थ आलेच. तर मिठाईशिवाय चर्चा सुध्दा होणार? विविध प्रकारचे पदार्थ आणि मिठाई या सणांची शोभा वाढवतात. पण या सणासुदीच्या काळात मधुमेहाचे रुग्ण अनेकदा निराश होतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी गोडाच्या पदार्थाचे सेवन केले तर त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्यांना गोड खाण्यास मनाई केली जाते. सणाच्या दिवशी त्यांना खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टीपासून व मिठाईपासून लांब राहावे लागते. परंतु, यंदाच्या दिवाळीत त्यांना शुगर फ्री मिठाई बनवून त्याचा आनंद आपण द्विगुणीत करु शकतो. त्यासाठी काही खास शुगर फ्री रेसिपी
1. काजू कतली
अनेकांना असे वाटते काजू कतली ही साखरेशिवाय बनवता येत नाही. पण तिची चव चाखायची असेल तर आपण शुगर फ्री पध्दतीने ती बनवू शकते. यासाठी फक्त 250 ग्रॅम काजू आणि आवश्यकतेनुसार पाणी लागेल. प्रथम काजू स्वच्छ धुवा. नंतर त्याची बारीक पेस्ट बनवा. गॅसवर तवा ठेवा आणि त्यात पाणी घाला. पाण्याला उकळी आली की त्यात शुगर फ्री साखर घाला.
साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा, साखरेचा पाक घट्ट झाल्यावर त्यात काजूची पेस्ट घाला. आता हळूहळू ढवळत राहा. काजूची पेस्ट चांगली शिजल्यावर आणि कढईतून बाहेर पडू लागल्यावर गॅस बंद करा, एका प्लेटमध्ये तूप पसरवून त्यात ही पेस्ट टाका. थंड झाल्यावर डायमंड आकारात कापून घ्या. शुगर फ्री काजू कतली तयार आहे.
2. नारळाचे लाडू
नारळाचे (Coconut) लाडू बनवायला खूप सोपे आहेत. यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम नारळ पावडरची गरज आहे. अर्धा लिटर दूध. आवडीनुसार बारीक चिरलेला सुका मेवा. ते बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात दूध गरम करा. त्यात नारळाची पूड घाला आणि ढवळत राहा. शिजल्यावर त्यात बारीक चिरलेला ड्रायफ्रुट्स टाका आणि मिक्स करा. थंड झाल्यावर लाडू बनवा
3. बेसन लाडू
यासाठी तुम्हाला एक वाटी बेसन, २ चमचे तूप, २ चमचे गूळ पावडर, ड्रायफ्रुट्स, एक कप दूध (Milk) लागेल. सर्व प्रथम दूध उकळून घ्या. बेसनाला भाजून घ्या. त्यात उकळलेले दूध घालून ढवळत राहा. थोड्या वेळाने या मिश्रणात गूळ आणि ड्रायफ्रुट्स टाका. ५ मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर लाडू बनवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.