Diwali Recipe 2022 : दिवाळी म्हटलं की, गोडाधोडाचे पदार्थ आलेच. त्यात रांगोळी, दिव्याची उधळण हे देखील येतात. दिवाळीच्या काळात आपण फराळ बनवतो पण काही वेळा तो फसतो किंवा तो चुकतो त्यामुळे पदार्थाची चव देखील बदलते.
दिवाळाची (Diwali) फराळ हा वर्षातून एकदाच बनत असल्याने तो छान बनावा व पदार्थाला चव यावी असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी आज आपण पाहूयात नेहमीच कडक होणारी शंकरपाळी यंदा खुसखुशीत कशी होईल. (Latest Marathi News)
खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
साहित्य
मैदा 500 ग्राम / अर्धा किलो
साजूक तूप 110 ग्रॅम ते 125 ग्रॅम
पिठी साखर 125 ग्रॅम
दूध (Milk) 110 ml ते 125 ml
तळण्यासाठी तेल किंवा तूप
वाटी चे प्रमाण –
मैदा 4 वाट्या
साजूक तूप ½ वाटी
पिठी साखर 1 वाटी
दूध ½ वाटी (थोडे प्रमाण बदलू शकते)
तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती
1. पसरट ताटात तूप थंड व पातळ करुन घ्या त्यात पीठीसाखर घाला. त्यानंतर चांगले एकजीव होईपर्यंत त्याला हाताने चांगले फेटून घ्या
2. चांगले फेटल्यानंतर त्यात कपभर दूध घाला. त्याला सुधा हाताने चांगले फेटून घ्या. तिन्ही गोष्टी चांगल्या एकजीव झाल्यानंतर त्यात हळूहळू मैदा घाला.
3. तयार सारणाला चांगले एकत्र करुन त्याला मळून घ्या. पीठ कडक झाल्यास चमचाभर दूध घालून पुन्हा मळा.
4. तयार पीठाचे गोळे करुन त्याला लाटू घ्या. दुसऱ्या बाजूने तेल गरम करायला घ्या.
5. गोळ्याची जाडसर चपाती लाटून घ्या व त्याला शंकरपाळ्यांचा आकार द्या
6. शंकरपाळी तळताना तेल मध्यम गरम करुन घ्या. मंद आचेवर हळूहळू शंकरपाळी तळा.
7. शंकरपाळी टम्म फुगेल व खुसखुशीत लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.