Anarsa Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Anarsa Recipe : दिवाळीसाठी घरच्याघरी बनवा मऊ अनारसे; या टिप्स फॉलो कराल तर रेसिपी चुकणार नाही

Anarsa Diwali Recipe : घरच्याघरी अनारसे बनवणे फार कठीण असते. असे काही महिलांना वाटते. त्यामुळेच या महिलांसाठी आम्ही अनारसे परफेक्ट पद्धतीने कसे बनवायचे याची सोपी रेसिपी आणली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीमध्ये विविध पदार्थ बनवले जातात. फराळाची विविध मेजवानी घरोघरी असते. काहींना लाडू, चिवडा, चकली आवडते तर काहींना शंकरपाळी आणि करंजी आवडतात. दिवाळीच्या पदार्थांमध्ये आणखी एक रुचकर पदार्थ म्हणजे अनारसे. अनारसे चवीला फारच छान लागतात. इतर सर्व गोड आणि तिखट पदार्थां व्यतिरिक्त याची चव निराळीच असते. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना अनारसे फार आवडतात. मात्र घरच्याघरी अनारसे बनवणे फार कठीण असते. असे काही महिलांना वाटते. त्यामुळेच या महिलांसाठी आम्ही अनारसे परफेक्ट पद्धतीने कसे बनवायचे याची सोपी रेसिपी आणली आहे.

साहित्य

आंबेमोहर तांदूळ

गुळ

सुंठ

वेलची

तेल

केळी

कृती

अनारसे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. मोजक्या साहित्यात अनारसे बनवून तयार होतात. मात्र हे बनवताना विशेष काळजी घ्यावी लागते. अनारसे बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यात तांदूळ भिजत ठेवा. तांदूळ तुम्हाला किमान तीन दिवस भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ भिजण्यासाठी घातल्यावर दररोज त्यातील पाणी बदलावे. तांदूळ आंबलेले असल्याने त्याचा उग्र वास येतो. हा वास जाण्यासाठी आपल्याला दररोज यातील पाणी बदलावे लागते.

सलग तीन दिवस तांदळामधील पाणी बदलल्यावर तिसऱ्या दिवशी तांदूळ पाण्यातून बाहेर काढून घ्या. तांदळामध्ये अजिबात पाणी राहणार नाही या पद्धतीने तांदूळ सुकवा. तांदूळ चुकूनही उन्हामध्ये सुकू नये. तांदूळ घरामध्येच फॅनच्या हवे खाली सुकवावेत. आपल्याला तांदूळ अगदी कडकडीत सुकवायचे नाहीत. तांदूळ जास्त सुटल्याने अनारसे फारच कडक होतात.

त्यामुळे तांदूळ फॅनच्या हवे खाली सुकवावेत. तांदूळ ओले असल्याने त्यातील मॉइश्चर निघून जाईल इथपर्यंतच तांदूळ सुकवावेत. तांदूळ सुकून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात त्याचे बारीक पीठ करून घ्यावे. या पिठामध्ये गुळ मिक्स करावा. तसेच तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुंठ आणि वेलची सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. अनारसेचे पीठ छान मळून घ्यावे. पीठ मळल्यानंतर लगेचच अनारसे बनवायला घेऊ नये.

अनारसेचे पीठ मुरावे लागते. त्यामुळे लगेचच अनारसे बनवू नयेत. एक दिवस पीठ तसेच झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी अनारसे बनवण्यास सुरुवात करावी. त्यासाठी सर्वात आधी या पिठामध्ये एक केळी कुस्करून मिक्स करावी. केळी मिक्स केल्याने अनारसे अगदी मऊ होतात. केळी मिक्स करताना अनारसेचे पीठ हाताने छान मळून घ्या. येथे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. स्पीड जितके छान मळले जाईल तितके अनारसे मऊ होतात.

अनारसेचे पीठ छान मळून झाल्यावर यातील थोडे थोडे पीठ घ्या आणि त्याचा गोळा करून घ्या. तयार बारीक गोळा तुम्हाला हवा त्या आकारामध्ये बनवून घ्या. त्यानंतर यावर एका बाजूने खसखस लावा. तसेच गरम तेलामध्ये अनारसे तळून घ्या. अनारसे तळताना गॅस जास्त फास्ट ठेवू नका. लो टू मिडीयम फ्लेमवर तुम्हाला अनारसे तळायचे आहेत. अशा पद्धतीने तयार झाले तुमचे खमंग आणि मऊ अनारसे.

या टिप्स फॉलो करत तुम्ही अनारसे बनवाल तर ते अनारसे अजिबात कडक होत नाहीत. तसेच अनारसे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर ते महिन्याभर चांगले राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT