Shreya Maskar
लसूणी शेव बनवण्यासाठी बेसन, लसूण, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, सोडा आणि ओव्याची पूड इत्यादी साहित्य लागते.
मिक्सरला लसूण पाकळ्या आणि थोडे पाणी टाकून बारीक करून पेस्ट करा.
आता एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, सोडा , ओव्याची पूड, खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ घाला.
आता वाटलेल्या लसूणाच्या पेस्टमध्ये थोड पाणी घाला.
लसूणाचे पाणी गाळून त्यामध्ये बेसनाच्या पिठाचे मिश्रण एकजीव करून घ्या.
पीठाला तेल लावून शेव पात्रात घाला.
मंद आचेवर तेल गरम करून त्यात शेव टाका.
गोल्डन रंग येईपर्यंत शेव मंद आचेवर खरपूस तळून घ्या.
चटपटीत, खमंग शेव तयार झाले.