डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आज कॅशलेस पेमेंटचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. हल्ली PhonePe, Google pay, Paytm यांसारखे UPI पेमेंटची सुविधा आपल्याला मिळते.
बरेचदा डिजिटल पेमेंट हे सगळीकडे उपयोगात येत नाही. परंतु, कधीकधी आपल्याला पैशांची आवश्यकता भासते. त्यावेळी आपण ATM मधून पैसे काढतो. पण अनेकदा पैसे न काढता ते कट होतात. अशावेळी आपल्याला नेमके काय करावे सुचत नाही. तसेच एटीएम कार्ड देखील हरवते. जर तुमच्या सोबतही असे झाले असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
1. एसएमएसद्वारे माहिती मिळेल
पैसे न काढता ते कट झाले तर तुम्हाला सर्वात आधी मेसेज येईल. अशावेळी तुम्ही टेन्शन घेण्याऐवजी त्वरीत बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.
2. अशावेळी काय कराल?
सर्वप्रथम बँकेच्या (Bank) कस्टमर केअरशी संपर्क साधा. तुम्ही तुमची समस्या देखील नोंदवू शकता. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तक्रार नोंदवतो आणि तक्रार ट्रॅकिंग रेकॉर्ड देतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, अशा समस्येमध्ये, बँकेला 7 दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करावे लागेल आणि खातेदाराच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील.
3. खात्यात (Account) पैसे न आल्यास नियम काय ?
बँकेने खातेदाराच्या खात्यात पैसे (Money) जमा केले नाहीत तर बँक तुम्हाला नुकसान भरपाई देईल. आरबीआयच्या सूचनेनुसार बँकेला ७ दिवसांत तक्रारीचे निराकरण करावे लागेल. जर बँकेने 5 दिवसांत निराकरण केले नाही तर बँकेला प्रतिदिन 100 रुपये दराने भरपाई द्यावी लागेल. याशिवाय ग्राहक https://cms.rbi.org.in वरही तक्रार नोंदवू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.