Diabetes Control Stomach Foods saam tv
लाईफस्टाईल

Diabetes : शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणत्या भाज्या रोजच्या आहारात असाव्यात? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Diabetes Control Vegetables: डायबिटीज नियंत्रणासाठी कोणत्या भाज्या रोजच्या आहारात घ्याव्यात? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कारलं, भेंडी, पालेभाज्या आणि हलक्या भाज्या शुगर नियंत्रणात मदत करतात.

Sakshi Sunil Jadhav

आजच्या धावपळीच्या आयुष्यात मधुमेहाचे म्हणजेच डायबिटीजचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. चुकीची जीवनशैली, बाहेरचं खाणं आणि व्यायाम टाळणं हे याचं एक कारण असू शकतं. त्यामुळे अनेकांना ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं कठीण जातं. डायबिटीजच्या रुग्णांनी काय खावं आणि काय टाळावं? यावर अनेकांना खूप शंका असतात. कारण यात चूक झाली की त्याचा परिणाम थेट ब्लड शुगर वाढीवर होतो आणि आरोग्यावर होतो. अशावेळी काही भाज्या डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतात.

डायबेटीजच्या रुग्णांसाठी कारलं फायदेशीर असतं. कारल्यामध्ये नैसर्गिकरित्या असणारे घटक हे शरीरातलं साखरेचं प्रमाण कमी करतं. यासोबतच मेथी, पालक आणि चाकवत अशा हिरव्या पालेभाज्या खाल्या पाहिजेत. याने रक्तातली साखर हळूहळू शोषली जाते. या भाज्या फायबरने समृद्ध असल्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

दुधी आणि दोडक्याच्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या पचायला हलक्या असतात. या भाज्या शरीराला हायड्रेट ठेवतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत करतात. भेंडी ही भाजी सुद्धा डायबिटीजसाठी चांगली मानली जाते. भेंडीत असलेले चिकट फायबर ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

याशिवाय शेवग्याच्या शेंगा आणि पानांमुळे इन्सुलिनची पातळी सुधारते. डायबिटीजच्या रुग्णांनी भाज्या फार जास्त शिजवू नयेत आणि शक्यतो कमी तेल व मसाल्यांत तयार केलेले अन्न खावे. योग्य आहार घेतल्यास आणि जीवनशैलीत थोडे बदल केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे नक्कीच शक्य आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहर शेख यांच्या विधानावरून भाजपमध्ये मतभेद; हिरव्या रंगावरून मंत्री गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य, VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील सिंहगड रोडवर वाहनावर झाड पडलं, रस्त्यावर झाली प्रचंड वाहतूक कोंडी

माजी आमदार आणि नगराध्यक्षाच्या घराबाहेर भानामती, ऐन ZP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

Vati Mangalsutra Designs: पारंपारिक वाटी मंगळसूत्राच्या हटके आणि स्टायलिश डिझाईन्स, हे आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स

Ahilyanagar Accident: ट्रकची धडक होताच दुचाकीवरील तरुण हवेत उडाला; खाली पडताच ट्रक अंगावरून गेला

SCROLL FOR NEXT