Diabetes Test  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Test : तरुणांनो, कमी वयात मधुमेह टाळायचा आहे? ३० शी ओलांडण्यापूर्वी करा या ३ टेस्ट

Diabetes Causes : मधुमेहामुळे हृदय, डोळे आणि किडनीवर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Diabetes Symptoms :

मधुमेहाच्या आजारामुळे सर्व वयोगटातील ९० टक्के लोक तरी त्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी, आहार, झोपेची वेळ, चिंता आणि तणावामुळे आपल्याला मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागते. हा सगळ्यात मोठा आजार असून यामुळे शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होतो. मधुमेहामुळे हृदय, डोळे आणि किडनीवर परिणाम होतो.

बहुतेकांना या आजाराची लक्षणे माहित नाही. त्यामुळे उशीर झाल्यावर जीव गमावावा लागतो. यासाठी मधुमेह वेळीच ओळखणे गरजेचे आहे. जर तुम्हाला सततचा ताण, झोपेची कमतरता आणि इतर लक्षणे जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच वयाची ३० शी ओलांडण्यापूर्वी या ३ टेस्ट नक्की करा

दिल्लीतील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ.स्वप्नील जैन यांनी Tv9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. यापूर्वी टाईप-२ मधुमेहाचे रुग्ण वयाच्या ५० वर्षानंतर आढळतात परंतु, चुकीचा आहार आणि आरोग्याची (Health) योग्य काळजी न घेतल्यास सध्या ३० व्या वर्षीच मधुमेहाचा आजार जडतोय. त्यामुळे या ३ चाचण्या करुन पाहाच

1. HbA1c Test

रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ही टेस्ट सर्वोत्तम मानली जाते. HBA1c चाचणीच्या मदतीने गेल्या तीन महिन्यांतील साखरेची (Sugar) पातळी कळेल. त्यामुळे मधुमेहाचा धोका कितीपर्यंत आहे हे कळेल.

2. OGTT Test

ओजीटीटी म्हणजे शरीरातील ग्लुकोजची पातळी चेक करणे. या टेस्टमुळे तुम्हाला मधुमेह (Diabetes) आहे की, नाही हे समजते. या चाचणीमध्ये रुग्णाला ग्लुकोजचे पाणी दिले जाते. त्यानंतर रक्त तपासले जाते. त्यानंतर यातून कळते की, रुग्णाची साखर किती दिवसांपर्यंत वाढलेली आहे.

3. Fasting Test

फास्टिंग ग्लुकोज टेस्ट ही शरीरातील साखरेची पातळी ओळखण्यासाठी केली जाते. ही टेस्ट सकाळी रिकाम्या पोटी केली जाते. ही टेस्ट करण्यापूर्वी किमान ८ तास तरी काही खावे लागत नाही. त्यातून कळते की, रक्तातील साखर वाढली आहे की नाही

4. मधुमेहाची लक्षणे कोणती?

खूप भूक लागणे

अचानक वजन कमी होणे

अशक्तपणा

थकवा

खूप तहान लागणे

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT