Diabetes In Children Saam tv
लाईफस्टाईल

Diabetes In Children: तज्ज्ञांनी दिली धोक्याची घंटा ! चिमुकल्यांमध्ये वाढतोय मधुमेहाचा आजार, कशी घ्याल काळजी

Symptoms of diabetes in children: सध्या मधुमेहचा शिकार लहान मुले देखील होत आहे.

कोमल दामुद्रे

Signs of Diabetes in Kids : मधुमेह हा आजार जगभरात सामान्य आजार म्हणून ओळखला जात आहे. सध्या भारतात ९० टक्के रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. या आजारामुळे शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम होतो. त्यामुळे याला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात.

या आजाराचा सामान प्रौढ व वृध्दांमध्ये दिसून येत होते. परंतु, सध्या याचा शिकार लहान मुले देखील होत आहे. नुकतेच जन्माला आलेल्या मुलांमध्ये देखील या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत.

एका अहवालानुसार 1990 च्या तुलनेत 2019 मध्ये, 10 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांमध्ये 52.06 टक्के आणि एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांमध्ये 30.52 टक्के वाढ झाली आहे. भारतातील मधुमेहाचा दर 1990 मध्ये 10.92 आणि 2019 मध्ये 11.68 होता, जो इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक होता. भारतात मधुमेहामुळे लहान वयात मृत्यू झालेल्या मुलांच्या संख्येत १.८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

1. मुलांमध्ये मधुमेह वाढण्याचे कारण काय ?

A. बदलेली जीवनशैली

भारतात वाढते प्रदूषण व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. डिजिटल युगामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी होत आहेत. त्यामुळे त्यांचा आहार देखील चुकतो आहे. मुले (Child) अतिप्रमाणात गोडाचे पदार्थ खातात. तसेच कॅलरीयुक्त स्नॅक्सचे सेवन करतात. ज्यामुळे वजन वाढते (Over Weight) व टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

B. अनुवंशिक

काही मुलांना मधुमेह होण्याचे अनुवंशिक कारण आहे. कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा आजार जडला असेल तर त्याचा धोका मुलांमध्ये अधिक प्रमाणात असतो. अनुवंशिकतेमुळे इतरांना इन्सुलिन प्रतिरोधक आणि टाइप 2 मधुमेह होण्याची अधिक शक्यता असते.

C. जागरूकतेचा अभाव

मधुमेहाच्या आजाराबद्दल काही ठिकाणी अजूनही जागरुकता नाही त्यामुळे वाढत्या वयात त्याचा कारणांकडे व लक्षणांकडे लक्ष दिले जात नाही. अशा परिस्थितीत मधुमेह झालेल्या मुलांना वेळीच उपचार न मिळाल्यास परिस्थिती गंभीर बनते.

2. मुलांना टाइप 1 मधुमेह कसा होतो?

टाइप 1 मधुमेहाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु असे अनेक घटक आहेत जे टाइप 1 मधुमेहास कारणीभूत ठरतात. शरीरातील कमी प्रतिकारशक्तीसह इतर अनेक कारणांमुळे स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन कमी होते. आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते.

मधुमेहाचा आजार हा बदलती जीवनशैली, अस्वस्थ्याकारक अन्नपदार्थ किंवा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होत नाही. हा रोग सामान्यतः बालपण किंवा पौगंडावस्थेमध्ये होतो, परंतु तो सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो. टाईप 1 मधुमेहासाठी आयुष्यभर इन्सुलिन थेरपी, साखरेचे प्रमाण वेळेवर निरीक्षण, संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम आणि औषधोपचार आवश्यक असतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT