कोमल दामुद्रे
वाढते वजन व मधुमेहामुळे आपले जीवन जगणे अशक्य झाले आहे.
आहारातील बदल, योगा व खाण्यापिण्यावर नियंत्रणात ठेवल्यास आपण या आजारावर आपल्याला मात करता येऊ शकते.
मधुमेह असलेल्या लोकांना रक्तातील साखरेमध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे यकृत दिवसासाठी शरीराला ऊर्जा देण्यासाठी अतिरिक्त ग्लूकोज तयार करते.
मधुमेहाच्या बाबतीत आपल्या शरीरात या संप्रेरकांचा प्रतिकार करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन नसते आणि म्हणूनच सकाळी रक्तातील साखर वाढू शकते
सकाळी खाल्लेले पदार्थ हे अधिक हेल्दी असतात असे म्हटले जाते त्यामुळे सकाळच्या वेळी कोणते पदार्थ खायला हवे जाणून घ्या.
1 चमचा गायीचे तूप हळद पावडरसोबत घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
१०० मिली पाण्यात १ टेबलस्पून अॅपल साइडर व्हिनेगर किंवा ३० मिली आवळ्याचा रस किंवा लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने फायदा होतो
रक्तातील साखर कमी करण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते.
१ चमचा मेथीदाणे रात्रभर भिजवून दाणे चावून या पाण्याचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रक्तातील साखर कमी करण्यासाठी आपण सकाळी प्रथम भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा नट खाऊ शकतो.