कोमल दामुद्रे
अधिक प्रमाणात पाणी न पिणे व लघवी थांबवून ठेवल्यामुळे किडनीचा आजार उद्भवला जातो.
किडनीचे कार्य सुरळीत असेल तर आपले आरोग्य चांगले राहाते.
परंतु, किडनीचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे जाणून घेऊया
आहारात विविध प्रकारच्या बेरीजचा समावेश करा
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंटस, फ्लेवोनाईडस असतात ज्यामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी सुधारण्यास मदत होते.
किडनीचे कार्य सुरक्षित करण्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरतील.
जर तुम्ही किडनी स्टोनचा त्रास सहन करत असाल तर नियमितपणे लिंबू पाण्याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.
आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश केल्यास शरीराला जीवनसत्त्व तर मिळतीलच तसेच अनसॅच्युरेटेड फॅट्स देखील मिळतील. ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारेल
लाल सिमला मिरचीमध्ये जीवनसत्त्व, फायबर. फोलिक अॅसिड असते ज्यामुळे शरीरातील पोटॅशियम कमी होण्यास मदत होते.
अनेकांची नावडती कोबी किडणीचे आरोग्य सुधारण्यासाठी बहुगुणी मानली जाते.