Diabetes Diet Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Diet Plan : वाढत्या साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवायचे आहे ? तर, ताटात ठेवू नका 'हे' पदार्थ

मधुमेह हा आजार जुनाट आणि चयापचय रोग यांच्याशी संबंधित आहे. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. ज्याचा परिणाम हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि नसा यांच्यावर होतो.

कोमल दामुद्रे

Diabetes Diet Plan : आपल्या दैनदिंन जीवनात आपण खाण्यापिण्याच्या सवयी अधिक वेळा बदलतो परंतु, मधुमेह असणाऱ्या अनेक पथ्य पाळावे लागते. त्याची खाण्यापिण्याची जीवनशैली बिघडली की, त्याच्या रक्तातील साखरेची पातळी झटकन वाढते.

मधुमेह हा आजार हल्ली लहान वयापासून ते वयोवृध्दांपर्यंत दिसून येत आहे. त्यांना शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून अनेक वेळा सारखेच पदार्थ खावे लागतात ज्यांचा त्यांना विट येतो.

हा आजार जुनाट आणि चयापचय रोग यांच्याशी संबंधित आहे. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोज (रक्तातील साखरेची) पातळी वाढते. ज्याचा परिणाम हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि नसा यांच्यावर होतो. कोणते पदार्थ खावे व कोणते टाळावे हे जाणून घेऊया.

१. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या जेवणाच्या ताटात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. भूक लागल्यानंतर फळे खाणे हा चांगला पर्याय आहे. फळे अन्नासोबत घेणे आवश्यक आहे.

२. फळे (Fruit) आणि भाज्यांमधून शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात, जे शरीराचे आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. फळांमध्येही साखर जरी असली तरी, ती नैसर्गिक असते.

३. अगदी कमी प्रमाणात लाल मांस देखील मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. दररोज ५० ग्रॅम मांस किंवा मासे खाल्ल्यास मधुमेह होण्याची शक्यता वाढते. तसेच, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ब्रेड, तळलेले आणि जास्त सोडियम असलेले मांस, हॉट डॉग आणि इतर प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे.

४. मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी मैदा अत्यंत हानिकारक आहे. मैद्यात खूप कमी पौष्टिक आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे. मैद्यात गोडवा नसेल, पण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण साखरेइतके वाढते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी भूक लागल्यावर लो-कार्ब भाज्या आणि काजू खावे.

५. जर एखाद्याला मधुमेह असेल तर कमी कार्बोहायड्रेट आणि साखर नसलेली मिठाई खाणे खूप कठीण असते. मधुमेहाच्या रुग्णांना अशा मिठाई शोधणे खूप कठीण आहे, ज्यात पोषण देखील आहे. पण डायबिटीज ग्रस्त लोक डार्क चॉकलेट खाऊ शकतात कारण त्यात साखर, कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज मिल्क चॉकलेटपेक्षा कमी असतात.

६. केळी आइस्क्रीम हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि साखर कमी असते. ट्री नट्सचे सेवन देखील केले जाऊ शकते कारण ते रिकाम्या पोटी इन्सुलिनची पातळी कमी करतात आणि इन्सुलिनचा प्रतिकार कमी करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT