diwali laddoo recipes saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2024: धनत्रयोदशीला बनवा खोबऱ्याच्या लाडूचा नैवेद्य; नोट करा सिंपल रेसिपी

diwali laddoo recipes: दिवाळी म्हंटल तर अनेक सण एकत्र साजरे केले जातात. त्या प्रत्येक सणाला काय नैवेद्य करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहीणीला पडतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार, या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन जन्माला आला होता. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी या विष्णूच्या १३ व्या आवाताराचे पुजन केले जाते. आता दिवाळी म्हंटल तर अनेक सण एकत्र साजरे केले जातात. त्या प्रत्येक सणाला काय नैवेद्य करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहीणीला पडतो त्यासाठी ही एक खास झटपट रेसिपी.

तुम्ही यंदाच्या दिवाळीत खोबऱ्याचे लाडू तयार करु शकता. हे लाडू तुम्ही धनत्रयोदशीला नैवेद्य म्हणून वापरु शकता. सोबत तुम्ही फराळासाठी सुद्धा हा गोड पदार्थ तयार करु शकता. चला तर जाणून घेवू खोबऱ्याच्या लाडवांची स्पेशल रेसिपी.

खोबऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी साहित्य

किसलेले खोबरे २ वाटी

साखर १ वाटी

दूध २ वाटी

शुद्ध तूप ३ चमचे

वेलची पावडर अर्धा चमचा

सुका मेवा आवडीनुसार बारिक पावडर करा

कृती

सर्वप्रथम एका पातेल्यात साखर आणि दूध गरम करुन घ्या. साखर पुर्णपणे विरघळल्यावर गॅस बंद करा. आता एका मोठ्या परातीत किसलेले खोबरे घ्या. त्यात वेलची पूड आणि थंड केलेला साखरेचा पाक अ‍ॅड करा. हे सगळे साहित्य हाताने मिसळून घ्या. आता त्यात थोडे-थोडे तूप घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या. हे मिश्रण अजीबात कडक होवू देवू नका. पुढे त्यात सुका मेवा अ‍ॅड करा. आता तयार मिश्रणाचे लहान गोळे वळून लाडू तयार करा. तयार आहेत तुमचे चविष्ट लाडू. हे लाडू तुम्ही नैवेद्याला सुद्धा वापरु शकता.

खोबऱ्याचे लाडू खाण्याचे फायदे

नारळात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपल्या पचनसंस्थेसाठी त्याचा भरपूर फायदा होतो. शिवाय नारळात अ‍ॅंटीऑक्सिडेंट असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. तसेच नारळात लॉरिक अ‍ॅसिड असते जे शरीरातली रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

Written by: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT