ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानांच बाहेरचे पदार्थ आवडत असतात.
तुमच्या याच आवडीकडे लक्ष देत तुमच्यासाठी मिरची भजीची रेसिपी घेऊन आलो आहोत.
कमी तिखट मोठ्या मिरच्या, बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, मीठ, बेकिंग सोडा, पाणी इत्यादी
प्रथम सर्व मिरच्या नीट स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्यांना मधोमध सुरीच्या साहाय्याने कापून त्यातील बिया काढून घ्या.
यानंतर एक बाउल घेऊन त्यात बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, मीठ आणि बेकिंग सोडा टाकून चांगले एक मिश्रण तयार करुन घ्या.
यानंतर त्या पीठात लागेल तेवढे पाणी टाकून थोडे घट्ट मिश्रण तयार करुन घ्या.
यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. मग त्यात तेल टाकून तेल गरम होऊ द्या.
तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक एक मिरची तयार बेसनाच्या पीठात बुडवून तेलात सावकाश सोडा.
अशाप्रकारे मिरची भजीला दोन्ही बाजूनीं तळून घ्या. यानंतर गॅस ऑफ करुन तुम्ही गरमा गरम मिरची भजी सर्व्ह करु शकता.
NEXT: कियाराचा कातिल अंदाज; व्हाईट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट