Dhantrayodashi Date Saam Tv
लाईफस्टाईल

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Dhantrayodashi Date Shubh Muhurat: धनत्रयोदशी २०२५ कधी आहे? जाणून घ्या १८ की १९ ऑक्टोबरला धनतेरस पूजा, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व. लक्ष्मी, कुबेर व धन्वंतरी पूजेमुळे घरात सुख-समृद्धी येते.

Manasvi Choudhary

धनतेरस यालाच धनत्रयोदशी असेही म्हणतात. दिवाळी सणाचा पहिला दिवस धनत्रयोदशी साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या १३ व्या तिथीला धनत्रयोदशी साजरा केला जातो. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून त्यांची पूजा केली जाते. तसेच देवी लक्ष्मी आणि कुबेरांचीही पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या देवांची पूजा केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि समृद्धी, संपत्ती, आरोग्य आणि आनंद मिळतो.

पंचागांनुसार, कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१८ वाजता सुरू होईल आणि १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १.५१ वाजता समाप्ती होणार आहे. त्यामुळे या वर्षी धनत्रयोदशी शनिवार १८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाईल. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्याचा शुभ मूहूर्त संध्याकाळी ७.४४ ते ८.४१ पर्यंत आहे असे मानले जाते. या काळात पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

धनत्रयोदशी हे केवळ संपत्तीचे प्रतीक मानले जात नाही तर त्याचे आध्यात्मिक महत्व आहे. आयुर्वेदानुसार भगवान धन्वंतरी या दिवशी अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी यमराजाचाही सन्मान केला जातो.

धनत्रयोदशी पूजा कशी करायची?

धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घर आणि देवघर स्वच्छ करा.

देवघर, पूजास्थळ दिवे, फुले यांना सजवून घ्या.

सायकांळी चौरंगावर लाल वस्त्र ठेवून गणपती, लक्ष्मी आणि कुबेराची मूर्ती स्थापित करा.

पूजेत देवतांना तुपाचा दिवा लावा आणि कुंकूचा टिळा लावा.

देवतांना फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा.

श्री लक्ष्मी, कुबेर मंत्र आणि धन्वंतरी स्त्रोताचे पठण केल्यानंतर आरती करा.

धनत्रयोदशी काय खरेदी करावे?

हिंदू धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्व आहे. धार्मिक आणि वास्तुशास्त्र परंपरेनुसार, या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोने- चांदी, तांब्याच्या वस्तू, झाडू,गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती, धणे, मीठ या वस्तू शुभ असतात. या वस्तू खरेदी करून पूजा केल्याने घरामध्ये सुख, शाती आणि सकारात्मकता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

Crime : बायकोनं दीरासोबत संसार थाटला, नवऱ्याची सटकली; घरात घुसून सासूची केली हत्या

Hingoli : हिंगोलीत ढगफुटी सदृश पाऊस, दसरा महोत्सवात पाणीचं पाणी | VIDEO

Lucky Moles: कुठे तीळ असल्यावर लक्ष्मीची कृपा बरसेल? नाक, ओठ की...

Raj Kundra: १५० कोटींचे बिटकॉईन, ईडीने फास आवळला, राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT