Morning Fatigue Can Be Serious Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

Early Symptoms of Cancer: कॅन्सरचं निदान जितक्या लवकर होतं तितके त्याचे उपचार प्रभावी होण्याची शक्यता वाढते. मात्र, कॅन्सरची अनेक सुरुवातीची लक्षणे इतकी सामान्य वाटतात की लोक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात

Surabhi Jayashree Jagdish

सध्या कॅन्सरच्या रूग्णांचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. अनेक दिग्गज व्यक्तींचा या आजाराने मृत्यू देखील झाला आहे. कॅन्सर हा असा एक भीतीदायक आजार आहे, ज्याचा विचार जरी केला तरी अनेकांच्या मनात धडकी भरते. या आजाराचे २०० हून अधिक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचं लक्षण वेगळं असतं. या आजारावर मात करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे त्याचं लवकर निदान होणं.

कॅन्सरची काही सामान्य लक्षणं म्हणजे वजन झपाट्याने कमी होणं, सतत थकवा जाणवणं, त्वचेतील बदल, शरीरावर गाठ येणं, कोणतीही स्पष्ट कारण नसताना रक्तस्राव होणे किंवा पोट फुगणं. मात्र यामध्ये एक लक्षण असं आहे जे अनेकदा दुर्लक्षित होताना दिसतं. रात्री झोपताना खूप जास्त घाम येणं.

रात्री जास्त घाम येणं

वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमची चादर आणि कपडे पूर्णपणे ओले झालेले असतील आणि खोलीचे तापमान सामान्य असेल तर हा घाम सामान्य नसून ‘नाईट स्वेट्स’ असू शकतो. ब्रिटनमधील ‘एनएचएस’ (NHS) संस्थेनुसार, जर ही स्थिती वारंवार होत असेल आणि त्यामुळे तुमची झोपमोड होत असेल तर याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.

कॅन्सर संशोधन संस्थांच्या मते, शरीरात संसर्ग झाल्यास घाम येणं सामान्य आहे. पण काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये जसं की लिम्फोमा, ल्युकेमिया, प्रोस्टेट कर्करोग, हाडांचा कॅन्सर आणि प्रगत थायरॉईड कॅन्सर रात्री खूप घाम येण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः जे रुग्ण कॅन्सरच्या प्रगत टप्प्यात असतात त्यांच्यात हे लक्षण अधिक दिसून येते.

डॉक्टरांची मदत कधी घेतली पाहिजे?

रात्री जास्त घाम येणं हे एकच लक्षण नसून काही इतर लक्षणांसोबत आढळल्यास ते अधिक गंभीर ठरू शकते. खालील लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या:

  • जर तुम्हाला दररोज रात्री खूप घाम येत असेल आणि त्यामुळे झोपमोड होत असेल.

  • यासोबतच जर ताप, सतत खोकला, थंडी वाजणे किंवा अतिसार होत असेल.

  • जर तुमचं वजन कोणतंही कारण नसताना झपाट्याने कमी होत असेल.

हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की, प्रत्येक वेळी रात्री घाम येणं म्हणजे कॅन्सरचं असेल असे नाही. पण जर हे तुमच्यासाठी नवीन आणि असामान्य असेल, तर डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT