Hair Wash Risks: सलोनमध्ये केस धुतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Salon hair wash stroke: अनेकदा सलूनमध्ये हेअर वॉश (Hair Wash) केल्यानंतर काही लोकांना मान दुखणे, चक्कर येणे किंवा संतुलन बिघडल्यासारखे वाटते. जगभरात या समस्येला 'ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम' म्हणून ओळखले जाते.
Salon hair wash stroke
Salon hair wash strokesaam tv
Published On

अनेकदा केस धुवायचा कंटाळा आला की आपण सलोनमध्ये जायचा विचार करतो. केस धुण्यासोबत एखादा हेअर कट आणि छान केस सेटही करून मिळतात. पार्लर किंवा सलोनमध्ये केसं धुणं हे अनेकांना रिलॅक्सेशनचा एक भाग वाटतो. थकलेल्या दिवसानंतर आराम देणारा अनुभव हा असू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हीच प्रक्रिया कधी कधी जीवघेणीही ठरू शकते?

अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, सलोनमध्ये केस धुतल्याने स्ट्रोक येतो. आज जाणून घेऊया, सलोनमध्ये हेअर वॉश केल्याने स्ट्रोकचा धोका खरंच असतो का, की हा केवळ एक गैरसमज आहे.

खरंच धोका असतो का?

या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम’ असं म्हणतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, हेअर वॉश करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. ही समस्या अत्यंत दुर्मिळ असली तरी पूर्णपणे अशक्य नाही.

सलोनमध्ये जेव्हा आपण डोकं मागे झुकवून वॉश बेसिनवर ठेवतो आणि बराच वेळ त्या स्थितीत राहतो, तेव्हा मानेतील सर्व्हायकल आर्टरीजवर दबाव येतो. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि अशा वेळी स्ट्रोकसारखी लक्षणं दिसू शकतात.

Salon hair wash stroke
Spine surgery: मणक्याच्या शस्त्रक्रियेला घाबरुन जाऊ नका; भिती कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

२०१६ मध्ये झालेल्या “Beauty Parlor Stroke Revisited” या संशोधनात ११ वर्षांच्या काळात फक्त १० प्रकरणं नोंदली गेली. यामध्ये हेअर वॉशमुळे स्ट्रोकसारखी लक्षणं दिसली. म्हणजेच, ही समस्या अत्यंत दुर्मिळ असली तरी अस्तित्वात आहे.

दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद कुमार यांनी एका वेबसाईटला माहिती दिली की, “हा धोका मुख्यतः त्या लोकांमध्ये अधिक असतो ज्यांच्या रक्तवाहिन्या आधीच कमजोर आहेत. इतकंच नाही तर ज्यांना किंवा ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकार आहेत. अशा लोकांच्या मानेवर अगदी थोडा दबाव आला तरी त्रास होऊ शकतो.”

Salon hair wash stroke
Pancreatic Cancer Symptoms: पायांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा स्वादुपिंडाचा कॅन्सर झालाय; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

काय काळजी घ्यावी?

तज्ज्ञ सांगतात की, योग्य काळजी घेतल्यास या समस्येचा धोका बऱ्यापैकी कमी करता येतो. हेअर वॉश करताना डोकं खूप वेळ मागे झुकवू नये. जर थोडाही त्रास किंवा अस्वस्थता वाटली, तर लगेच हेअर ड्रेसरला सांगावं. ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाचे आजार आहेत, त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

Salon hair wash stroke
High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

तज्ज्ञांच्या मते, सलोनमध्ये हेअर वॉश करणं बहुतांश वेळा सुरक्षित असते. लाखो लोक नियमितपणे हे करवून घेतात आणि त्यांना काहीही त्रास होत नाही. परंतु ही समस्या जरी दुर्मिळ असली तरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही.

Salon hair wash stroke
Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

जर हेअर वॉशनंतर मान दुखणे, चक्कर येणं किंवा अस्वस्थ वाटणं अशा लक्षणांचा अनुभव येत असेल, तर ती गोष्ट गंभीरपणे घ्यावी आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com