Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Lack of sleep warning signs: आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी झोप मिळणं हे एक मोठं आव्हान बनलंय. आपण अनेकदा कामाच्या दबावाखाली, सोशल मीडियावर किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे आपल्या झोपेशी तडजोड करतो.
Sleeping Disorder
Sleeping DisorderSaam Tv
Published On

दीर्घकाळ झोपेची कमतरता शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम करते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मृती कमी होण्यासारखे आजार यामुळे उद्भवू शकतात. आजच्या धावपळीच्या जगात झोपेची कमतरता ही एक सामान्य गोष्ट झालीये. कधी वेब सिरीज पाहत बसणं, मोबाईलवर सतत स्क्रोल करत राहणं, कामाच्या डेडलाइनचा ताण, प्रोजेक्ट पूर्ण करण्याची घाई किंवा रात्री विचारांच्या गर्तेत अडकून पडणं या सर्वांमुळे झोप पूर्ण होत नाही.

२०२५ च्या झोपेवरील एका अहवालानुसार, जगभरातील जवळपास एकतृतीयांश प्रौढ लोकांना दररोज सात तासांपेक्षा कमी झोप मिळते. झोपेच्या दीर्घकालीन परिणामांवर दुर्लक्ष केलं तरी, तात्काळ होणारे दुष्परिणाम टाळता येत नाहीत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फक्त दोन तास झोप घेण्याची सवय दीर्घकाळ ठेवल्यास शरीर आणि मेंदूवर काय परिणाम होतात.

मेंदू आणि शरीरावर तात्काळ काय परिणाम होतो?

दररोज फक्त दोन तास झोपल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होतो. अशा स्थितीत थकवा, एकाग्रतेचा अभाव, प्रतिसाद देण्याची गती मंदावणं आणि चिडचिड हे सर्वात पहिलं परिणाम दिसतात. मेंदू माहिती योग्य प्रकारे प्रक्रिया करू शकत नाही. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.

Sleeping Disorder
Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

शारीरिकदृष्ट्या, हार्मोन्सचं संतुलन बिघडतं कॉर्टिसोल या ताण निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अगदी एकाच रात्रीची झोप न झाल्यासही समन्वय आणि निर्णयक्षमता प्रभावित होते.

भावनांवर आणि निर्णयक्षमतेवर काय परिणाम होतो?

दीर्घकाळ झोप न झाल्यास मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (जो विचार, निर्णय आणि संयम नियंत्रित करतो) याची कार्यक्षमता कमी होते. तर Amygdala (भावना जसं की राग, भीती नियंत्रित करणारा भाग) अतिसक्रिय होतं. यामुळे व्यक्ती अधिक भावनिक, चिंताग्रस्त आणि मूड स्विंग्सकडे झुकणारी बनते.

Sleeping Disorder
Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

परिणाम किती लवकर दिसू लागतात?

फक्त काही दिवसांतच झोपेची कमतरता त्वचेवर दिसू लागते. त्वचेचं नैसर्गिक तेज कमी होतं कारण कोलेजनचं उत्पादन घटतं. डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसतात. हार्मोन्सच्या असमतोलामुळे वजनातही बदल दिसू शकतो. याशिवाय झोपेच्या अभावामुळे घ्रेलिन (भूक वाढवणारा हार्मोन) वाढतो आणि लेप्टिन (पोट भरल्याची भावना देणारा हार्मोन) कमी होतो, ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होते.

Sleeping Disorder
Heart attack warning signs: महिलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही 6 महत्त्वाची लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

हृदय, मेंदू आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

दीर्घकाळ झोप न झाल्यास उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मृती कमी होण्याचा धोका वाढतो. मेंदूतील टॉक्सिन घटक काढून टाकण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे अल्झायमरसारख्या न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजारांचा धोका वाढतो.

Sleeping Disorder
Heart attack: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस अगोदर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com