Success story saam tv
लाईफस्टाईल

Success story: अपंगत्व आणि दृष्टीदोष असूनही रूपेशने पूर्ण केली स्वतःची स्वप्नं; पाहा त्याची यशोगाथा

निराश न होता रीडर रायटर वापरुन रूपेशचं शिक्षण चालू होतं. शाळेच्या जीवनात विविध स्पर्धात भाग घेऊन आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवणाऱ्या रूपेशचं शाळेत कौतुक होत असे. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी काव्यलेखनाला सुरवान केली. आणि अनेक बक्षिसे मिळवली.

Neeta Mali

लेखक, कवी, पत्रकार, कथाकथनकार, निवेदक, अभिवाचक अशा विविध पैहुंनी परिपूर्ण असे चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व म्हणजे एडव्होकेट रूपेश पवार. अपंगत्वावर मात आपल्या खऱ्या अर्थाने आयुष्याला सामोरे जाणारे आणि आपल्या कर्तृत्वामळे सर्वदूर परिचित असणारे रूपेश भैरवनाथ पवार यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. लहान वयात सेलिब्रल पार्सी (बहुविकलांग) या आजाराने ग्रस्त होते. रुपेशला आई बाबांच्या कष्टांची जाणीव घेती. शारीरिक अपंगत्व होतंच पण त्यातच भर पडली ती इष्टीदोषाची! उपेश हुशार होता, त्याने आकलन, स्मरणशक्ती उत्तम होती.

बी. ए. झाल्यावर त्यांनी एल एल बी. प्रवेश घेतला. त्याच दरम्यान त्याच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया झाली. रिकव्हर होण्याचा काळ सहा महिन्यापासून चार वर्षे इतका होना. पण अतिशय सकारात्मक दृष्टीकोन बाळगणाऱ्या, लेखनाची आवड जपणाऱ्या त्यासाठी आवश्यक उपजत प्रतिभा लाभलेल्या रूपेशने ठाणे वैभवमध्ये स्तंभलेखनास सुरुवात केली. एका गुरुंच्या सहवासातून सहवाद्वारे जीवनाकडे आणि आशीर्वाद रूपेशना लाभला. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याची अनोखी इष्टी त्यांना मिळाली.

शब्दांवर प्रेम करणाऱ्या कवीचं काव्यलेखन सुरुच होतं. २०११ ला काव्यसंग्रह अंतरंग नावाचा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. साहित्याच्या वाटेवरची त्यांची यशस्वी घौडदौड सुरु झाली. अत्यंत नम्र स्वभाव माणसं जोडण्याची सवय, सर्वांना मदत करण्याची आवड, यामुळे रूपेश यांना साहित्यिक न सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवराचा सहवास लाभला. त्या सर्वांनी भरपूर प्रेम, प्रोत्साहन दिलं.

शारदा प्रकाशन अर्थात संतोष राणे यांनी कुशाग्र बुद्धीच्या रूपेश यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. अंतरंग (काव्यसंग्रह), वलयोकीन (ललित लेखन), नशा (दीर्घ काव्य), प्रतिभावंतांच्छा रंगसावळ्या (लेखसंग्रह), मनोगाथा (लघुकथासंग्रह) चिंतनातील विचार, अभंग जीवन, करा विचार (लेखसंग्रह ) ही त्यांची पुस्तकं प्रसिद्धध आहेत. रसिकांनी, जाणकारांनी या पुस्तकांचं कौतुक केलं आहे.

विशेष म्हणजे रूपेश यांना गीतलेखनाची सुद्धा आवड आहे. चैतन्य विचारधारा या चॅनेलवर राजेंद्र सावन यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली त्यांची गाणी श्रवणीय आहेत. अनेक विषयांवर ते कथाकथन, काव्यवाचेन, व्याख्यानांसाठी जात असतात. कथाकथन, मुलाखती, शालेय अशा विविध उपक्रमात सतत कार्यमग्न असणाऱ्यासा रूपेश पवार यांना अध्यात्मिक विचारांची आवड आहे, जाण आहे. आपल्या अपंगत्वावर मात करताना, आयुष्यातल्या अडचणींना, दुःखांना सामोरे जाताना, अध्यात्माने मला सशक्त बनवलं, असे ते म्हणतात. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समतोल साधणाऱ्या रुपेश यांना भारतीय जनता पार्टीच्या, अध्यात्मिक समन्वय आघाडी - ठाणे जिल्हा या पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.

आपली सामानिक बांधीलकी जपण्यासाठी त्यांनी चैतन्य चैरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्स्टच्या माध्यमातून दिव्यांगांना, गरजूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यांचा त्यांचा मानस आहे. शरीराने अपंग जीवनातील प्रत्येक आव्हान रुपेशजींनी स्विकारलं. मोठ्या जिदीने एक एक स्वप्न पूर्ण केलं. व्हीलचेअर सारख्या प्रवासाला खर्या अर्थाने गती दिली. त्यांच्या कार्याची दखल अनेक मासिकांनी, वृत्तपत्रांनी घेतली. अनेक मान्यवर पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

नुतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT