effects of pesticide powder on human health Saam Tv
लाईफस्टाईल

Grain Pests: धान्यात किटकनाशक पावडर टाकताय? आताच सावध व्हा! गंभीर आजाराला निमंत्रण; करा हे नैसर्गिक उपाय

Natural Pest Control Methods For Wheat And Rice: धान्यांमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर गंभीर आजारांना निमंत्रण करतात. यासाठी कडुनिंबाची पाने, लसूण गड्डी व लवंग यासारखे नैसर्गिक उपाय धान्यांना सुरक्षित ठेवतात.

Omkar Sonawane

रासायनिक कीटकनाशकांचा वापर धान्यातील कीड प्रतिबंधासाठी सामान्य आहे, परंतु त्याचे गंभीर आरोग्य परिणाम आहेत.

कीटकनाशक वापरल्याने पोटातील रासायनिक प्रतिक्रिया विषबाधा आणि आजार निर्माण करू शकते.

कडुनिंबाची पाने, लसूण व लवंग हे नैसर्गिक कीटकनाशक उपाय आहेत.

कृषि तज्ञांच्या सल्ल्यानेच धान्य जतन करणे सुरक्षित ठरते.

घरामध्ये गहू, तांदूळ आणि इतर धान्यांचा सर्वचजन वर्ष दोन वर्षांसाठी त्याचासाठा करून ठेवत असतात. मात्र, त्याला कीड लागू नये म्हणून् रासायनिक कीटकनाशकांच्या गोळ्या, बोरिक पावडर वापरली जाते. मात्र याचा आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतो आणि त्याचा अनेक गंभीर आजाराला निमंत्रण दिले जाते. या गोळ्या आणि पावडरचा गॅस तयार होऊन विषबाधा झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली होती. कीडनाशक वापराचे धोके, काय काळजी घ्यावी हे माहित करून घ्यावे असे कृषि विषयातील तज्ञांनी सांगितले आहे.

धान्यांमधील कीड रोखण्यासाठी कीडनाशकांचा वापर सर्रासपणे केला जातोय. मात्र त्यामुळे अनेक गंभीर आजारांना आपण निमंत्रण देत असून त्यामुळे अन्नधान्यास विषबाधा देखील होऊ शकते. या कीडकनाशकांमध्ये सेल्फॉस हे कीटकनाशक आहे. त्याला अॅल्युमिनियम फॅास्फॅाइड आहे. ते पोटातील हायड्रोक्लारिक आम्लाशी प्रक्रीयेने फॅास्फिन वायु तयार करते, जो रक्तात फिरतो आणि मायटोकॅान्ड्रियाच्या इलेक्ट्रॅान वाहतुक प्रणालीला अर्धांगवायू करू शकतो.

कीटकनाशके पावडरमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात?

धान्यातून विषबाधा झाल्यास पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, जुलाब आणि ताप देखील येऊ शकतो असे तज्ञांनी सांगितले आहे.

करा हे पारंपारिक नैसर्गिक उपाय

धान्यामध्ये काही कडूनिंबाची पाने टाकल्यास धान्याला कीड लागत नाही.

तसेच लसणांची गड्डी ठेवल्याने धान्याला कीड लागत नाही.

लवंगचा उग्र वास देखील कीटकांना धान्याजवळ येऊ देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा माज! भररस्त्यात गांजा ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल

Vijay Deverakonda: रश्मिकासोबत साखरपुड्यानंतर विजय देवरकोंडाचा भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर

CJI Bhushan Gawai : सुप्रीम कोर्टातील हल्ल्यानंतर PM मोदींचा सरन्यायाधीशांना फोन, दोघांमध्ये काय संवाद झाला?

Cyclone Shakti: महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट,पुढील 48 तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT