Sharad Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला करा हे ६ उपाय, सर्व समस्या होतील दूर अन् घरात येईल पैसा

शरद पौर्णिमा 2025 या दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. या दिवशी उपवास, दूध सेवन आणि मंत्रजप केल्याने आरोग्य, संपत्ती आणि सौभाग्य लाभते.
Kojagiri Purnima 2025
Kojagiri Purnima 2025Saam Tv
Published On

हिंदू धर्मात, अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेला चंद्रदेव भगवान विष्णून आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात. कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि भगान कार्तिकेय यांचा जन्म झाला. सुख, सौभाग्य आणि आरोग्य चांगले राहते. इच्छा पूर्ण करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय करावेत.

Kojagiri Purnima 2025
Hair Care: केसातला कोंडा कमी होत नाहीये? मग महागडे प्रोडक्ट्स सोडा अन् 'हे' घरगुती उपाय करा

शरद पौर्णिमेच्या दिवशी उपवासाचे व्रत पाळावे. कोजागिरी पौर्णिमेचा उपवास केल्याने चंद्रदेव भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व सुखाचा आनंद मिळतो.

हिंदू धर्मात कोणताही देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही शुभ दिवशी मंत्राचा जप करा. शरद पौर्णिमा पूजेचे शुभ फळ मिळवण्यासाठी यासाठी भगवान विष्णू आणि चंद्र देवाची पूजा करा मंत्रांचा जप करा.

Kojagiri Purnima 2025
Panic Attack Symptoms: गर्दीत घाबरल्यासारखं वाटतंय? असू शकतो पॅनिक अटॅकचा धोका, वेळीच ओळखा लक्षणं

शरद पौर्णिमेला चंद्र देवाची पूजा करणे महत्वाचे मानले जाते. या दिवशी चंद्र त्याच्या पूर्ण तेजात असतो. या दिवशी चांदीच्या भांड्यात चंद्र देवाला दूध आणि पाणी अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते याचा शुभ परिणाम होतो.

शरद पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात, जी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. कोजागरी म्हणजे "कोण जागे आहे?" या दिवशी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा विधी करतात आणि रात्री जागे राहून मंत्राचा जप करतात. असे मानले जाते की या प्रथेचे पालन केल्याने वर्षभर घरात समृद्धी येते.

शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे विशेषतः पठण करावे. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात.

Kojagiri Purnima 2025
Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वीच निघेल 'दिवाळं', चुकूनही घराला देऊ नका हे रंग, वास्तुदोषाचा करावा लागेल सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com