Hair Care: केसातला कोंडा कमी होत नाहीये? मग महागडे प्रोडक्ट्स सोडा अन् 'हे' घरगुती उपाय करा

Natural Hair Growth: हिवाळ्यात डोक्यात कोंडा आणि खाज वाढते. महागडे प्रॉडक्ट्स न वापरता दही, लिंबू, मेथी, अॅलोवेरा, कडुलिंब यांसारख्या घरगुती उपायांनी केस निरोगी व शाइनिंग ठेवता येतात.
Home remedies for dandruff treatment
Home remedies for dandruff treatmentgoogle
Published On
Summary
  • कोरड्या स्कॅल्पमुळे कोंड्याचं प्रमाण वाढतं.

  • महागडे शॅम्पु न वापरता घरगुती उपाय फायदेशीर ठरतील.

  • दही, लिंबू, मेथी, कोरफड, कडुलिंब हे नैसर्गिक घटक कोंडा कमी करतात.

  • हे उपाय नियमित केल्यास केस पुन्हा निरोगी आणि चमकदार दिसतात.

पावसाचे दिवस संपायला फक्त काही दिवस शिल्लक राहीले आहे. एकदा का हिवाळा आला की, अनेकांना आणि विशेषत: महिलांना डोक्यात कोंडा आणि डोक्यात खाज सुटते. कोंड्यामुळे केसांची शाइन कमी होतेच, त्याचसोबत कपड्यांवर पडणाऱ्या पांढऱ्या कणांमुळे अनेकांना लाजिरवाणी परिस्थितीला सामोरं जावं लागतं. बाजारात अनेक महागडे शँपु उपलब्ध असले तरी त्याचा परिणाम हा कमी दिवस जाणवतो. म्हणूनघरगुती सोपे उपाय करून केसातील कोंडा कमी करता येऊ शकतो.

दही, लिंबू, अॅलोवेरा, बेकिंग सोडा, मेथी आणि कडुलिंब या नैसर्गिक गोष्टींच्या वापराने डोक्याची स्वच्छता होते आणि कोंडा कमी होतो. दह्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने केसांना मजबुती मिळते तसेच केसात कोंडा होत नाही. दह्याची पेस्ट करून तुम्ही १५ ते २० मिनिटे केसांमध्ये लावू शकता. त्याने डोक्याला थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.

Home remedies for dandruff treatment
Colon Cancer: सतत पोटदुखी अन् थकवा जाणवतोय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध

लिंबाचा रस आणि नारळाचे तेल एकत्र करून केसांमध्ये लावणे हा कोंडा कमी करण्याचा जुना आणि रामबाण उपाय आहे. लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्याने डोक्याची स्वच्छता होते आणि संसर्ग टाळला जातो. अॅलोवेरामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यात लिंबाचा रस आणि तेल मिसळूनही वापरता येतं. यामुळे खाज कमी होते आणि केस हेल्दी चमकदार दिसतात.

मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट करून केसांवर लावल्याने कोंड्याचे प्रमाण कमी करता येते. मेथीचे दाणे तेलात उकळवून ते थंड झाल्यावर स्कॅल्पमध्ये मसाज केल्यासही फायदा होतो. कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा दूर होतो. त्यामधील अँटीफंगल गुणधर्मामुळे डोक्याची स्वच्छता होते आणि संसर्गापासूनही संरक्षण होतं. बेकिंग सोडा केसांवर हलक्या हाताने चोळल्यास मृत त्वचा निघून जाते आणि कोंडा कमी होतो. हे उपाय नियमितपणे केल्यास हिवाळ्यातील कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते आणि केस पुन्हा एकदा निरोगी व सुंदर दिसू लागतात.

Home remedies for dandruff treatment
Heart Attack: बिछान्यावर झोपताच खोकला येतोय अन् पाय सुजतायेत? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com