Tiffin Box Recipes  yandex
लाईफस्टाईल

Tiffin Box Recipes : तुमची मुलं भाज्या खात नाहीत? मग मुलांना टिफीनमध्ये द्या 'या' स्टाईलची क्रिस्पी भेंडी

Bhendi Recipe : हिवाळ्यात बरीच लहान मुलं भाज्या खाणं टाळतात. त्यांच्या आवडत्या नसल्या तर ते टिफीन सुद्धा तसाच आणतात अशा वेळेस आपण त्यांना वेगळ्या आणि त्यांच्या चवीप्रमाणे भाज्या तयार करू शकतो.

Saam Tv

हिवाळ्यात बरीच लहान मुलं भाज्या खाणं टाळतात. त्यांच्या आवडत्या नसल्या तर ते टिफीन सुद्धा तसाच आणतात अशा वेळेस आपण त्यांना वेगळ्या आणि त्यांच्या चवीप्रमाणे भाज्या तयार करू शकतो. त्यात तुम्ही तुमच्या मुलांना न आवडणाऱ्या भाज्यांचा समावेश करू शकता. तर आज आपण क्रिस्पी भेंडी फ्राय रेसिपी तयार करणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी असणार आहे.

लहान मुलांना किंवा मोठ्यांना बाहेरचं खाणं प्रचंड आवडतं. मग त्यात ते जरा क्रिस्पी पदार्थ शोधत असतात. पण प्रत्येक वेळेस बाहेरचे पदार्थ खाणं योग्य नसतं. अशा वेळेस तुम्ही घरी कमी तेलात आणि स्वच्छ पद्धतीने तयार केलेल्या भाज्यांचे वेगवेगळे आणि झटपट तयार होणारे पदार्थ तयार करून देऊ शकता. शिवाय तुम्ही शरीराला उबदार पणा , आवश्यक पोषक तत्व मिळतील असे पदार्थ तयार करू शकता. चला तर जाणून घेवू भेंडीची रेसिपी.

क्रिस्पी भेंडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

२५० ग्रॅम भेंडी

अर्धी वाटी बेसन

अर्धी वाटी तांदूळ

1/4 टीस्पून हळद

1/4 टीस्पून लाल तिखट

1/2 टीस्पून जिरे पावडर

1/2 टीस्पून धने पावडर

1/2 टीस्पून चाट मसाला

1/2 टीस्पून लिंबाचा रस

चवीनुसार मीठ

तेल

क्रिस्पी भेंडी तयार करण्यासाठी कृती

सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या. यानंतर भेंडीचे लांब काप करा आणि त्यातल्या बिया काढून टाका. बिया काढल्याने त्या तळताणा अंगावर उडणार नाहीत. आता भेंडीचे काप एका भांड्यात ठेवा आणि त्यात हळद, जिरेपूड, धनेपूड, तिखट आणि चाट मसाला हे सर्व जिन्नस मिक्स करा. एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ अॅड करा आणि आता भेंडीला 10 मिनिटे मॅरीनेट करू द्या.

आता तुम्ही भेंडीला कोट करण्यासाठी बेसन आणि तांदळाचे पीठ तयार करू. बेसन आणि तांदळाचे पीठ एका वाटीत काढून घ्या. त्यात चवीपुरते मीठ मिक्स करून घ्या. हे करताना भेंडीत अजिबात पाणी टाकू नका नाहीतर भेंडी चिकट होईल. आता तुम्ही मॅरिनेट करायला ठेवलेली भेंडी या बॅटरमध्ये अॅड करा. बाजूला तुम्ही एका कढईत तेल गरम करायला ठेवा. ही रेसिपी तुम्ही कमी तेलात सुद्धा तयार करू शकता. आता तेल तापल्यावर तुम्ही त्यात भेंडीचे काप टाकून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या. आता तयार रेसिपी मुलांना चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत टिफीन बॉक्समध्ये देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT