Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंड वातावरणात गरमा-गरम पदार्थ खाण्याची चटक लागते.
यामुळेच आरोग्यासाठी फायदेशीर असा आले आणि लसूणचा सूप बनवा.
आले आणि लसूण सूप बनवण्यासाठी बारीक चिरलेले लसूण , चिरलेले गाजर, वटाणा, चिरलेली कोबी, मीठ, तेल, लसूण आणि मिरचीची पेस्ट हे साहित्य घ्या.
सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये गरम तेलामध्ये आले आणि लसूण टाका.
नंतर या मिश्रणात गाजर,वटाणा आणि कोबी घाला.
नंतर यामध्ये पाणी आणि मीठ टाकून लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून ढवळून घ्या.
हे संपूर्ण मिश्रण नीट शिजेपर्यंत चांगले उकळून द्या.
अशाप्रकारे गरमा गरम सूप पिण्यासाठी तयार आहे.