Idli  Cooking Tips
Cooking TipsSaam TV

Rava Idli Recipe : थंडीमध्ये इडलीचं पीठ फुगत नाहीय? मग 'ही' एक वेगळी ट्रिक वापरून पाहा, होतील मऊ लुसलुशीत इडल्या

Breakfast Recipe : थंडीमध्ये प्रत्येकाला गरमा गरम नाश्ता करायला आवडतो. त्यात जर पौष्टीक पदार्थ असतील तर नाश्त्याला आणखीच मजा येते. आज आपण अशीच एक छान रेसिपी पाहणार आहोत.
Published on

थंडीमध्ये प्रत्येकाला गरमा गरम नाश्ता करायला आवडतो. त्यात जर पौष्टीक पदार्थ असतील तर नाश्त्याला आणखीच मजा येते. आज आपण अशीच एक छान रेसिपी पाहणार आहोत. आता हिवाळा म्हंटलं की झोप जरा जास्तच लागते मग कमी वेळात जेवण किंवा स्वयंपाक तयार होत असेल तर तुम्ही हा झोपेचा आनंद सुद्धा घेई. तर आज आपण परफेक्ट आणि एकदम कापसारखी सॉफ्ट रवा इटली तयार करणार आहोत. बऱ्याच वेळेस थंडीत इडलीचं पीठ फुलत नाही. त्यामुळे या रेसिपीत तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

रवा इडली तयार करण्याचे साहित्य

1 कप रवा (सूजी)

1 कप दही

1/2 कप पाणी (गरजेनुसार)

1 चमचा तेल

1/2 चमचा मोहरी

1/2 चमचा उडीद डाळ

1-2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)

8-10 कढीपत्ता पाने

1/4 चमचा इनो फ्रूट सॉल्ट किंवा 1/2 चमचा बेकिंग सोडा

चवीनुसार मीठ

भाज्या (इच्छेनुसार - गाजर, कोबी, मटार, शिमला मिरची)

Idli  Cooking Tips
Diabetes : 20 रुपयांना मिळणारे फळ करेल तुमचा डायबेटीज कमी, वाचा काय आहेत फायदे

रवा इडली तयार करण्याची रेसिपी

रवा भाजणे - एका पॅनमध्ये रवा 3-4 मिनिटे हलक्या आचेवर कोरडा भाजा, जोपर्यंत त्याचा सुगंध येईल तो पर्यंत तो व्यवस्थित भाजून घ्या. आता भाजून घेतलेला रवा बाजूला ठेवा.

फोडणी तयार करणे - एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करा. त्यात मोहरी, उडीद डाळ, चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि भाज्या 2-3 मिनिटे परतून घ्या.

मिश्रण तयार करणे - आता एका वाडग्यात भाजलेला रवा, दही आणि थोडेसे पाणी घालून मिक्स करा. मिश्रणाला गुठळ्या होऊ देऊ नका. नंतर त्यात तयार केलेली फोडणी आणि मीठ अ‍ॅड करा.

बेस तयार करणे - पुढे मिश्रण 10-15 मिनिटे झाकून ठेवा. जर ते खूप घट्ट झाले असेल तर थोडे पाणी अ‍ॅड करून योग्य बॅटर तयार करा.

इनो फ्रूट सॉल्ट घालणे - वाफवण्याच्या आधी इनो फ्रूट सॉल्ट मिक्स करून हलक्या हाताने ढवळा. इनो घातल्यावर मिश्रण फुगून हलके होते.

इडल्या वाफवणे - आता इडली पात्राला तेल लावा. तयार मिश्रण थिंडीच्या खाचांमध्ये ओता. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा आणि बॅटर आत ठेवा. हे मिश्रण 12-15 मिनिटे वाफवून घ्या.

चाचणी - सुरीने तपासा, जर ती स्वच्छ बाहेर आली तर इडली तयार आहेत.

टीप्स

दही ताजे आणि किंचित आंबट असेल तर इडली मऊ होते.

इनो फ्रूट सॉल्ट घातल्यावर मिश्रण पटकन वाफवायला ठेवा, नाहीतर इडली फुगत नाही.

पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा, खूप घट्ट किंवा खूप पातळ मिश्रण केल्यास इडली मऊ होत नाहीत.

रवा भाजणे हा टप्पा चुकवू नका, त्यामुळे इडली मोकळीसर आणि चविष्ट होते.

तुमच्या सॉफ्ट रवा इडल्या तयार आहेत! त्यासह नारळाची चटणी आणि सांबार सर्व्ह करून हिवाळ्याचा आनंद घ्या. अशा सोप्या रेसिपी पौष्टीक आणि कमी वेळात तुम्ही तयार करू शकता.

Idli  Cooking Tips
Allu Arjun Fitness Routine : पुष्पासारखी बॉडी हवीय? 'हे' आहे फिटनेस सीक्रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com