
भारतामध्ये डायबेटिस किंवा उच्च रक्तदाबासारख्या समस्यांकडे लक्ष देण्याच्या भरात बरेचदा कोलेस्ट्रोलच्या वाढणाऱ्या पातळीकडे दुर्लक्ष केले जाते. लिपिड प्रोफाइलच्या चाचणीतून एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या समस्या उद्भवण्याचा कितपत धोका आहे. याविषयीची आज आपण जाणून घेण्यार आहोत. यामुळे आपल्याला रक्तातील लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्ट्रोल, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्ट्रोल , एकूण कोलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसराइड्ससारख्या अनेक घटकांची पातळी मोजता येते.
लिपिड प्रोफाइल चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आपण ज्याला ‘बॅड कोलेस्ट्रोल’ म्हणतो त्याची एल डी एल सी ची पातळी वाढल्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणूनच तर त्याला ‘सायलेन्ट किलर’ हे नाव मिळाले आहे. कालांतराने धमन्यांमध्ये त्याचा थर साचत जातो आणि त्यातून अडथळे अर्थात ब्लॉकेजेस तयार होतात व त्यामुळे हृदयाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारखे मोठे धोके निर्माण होतात. म्हणूनच या समस्येचे निदान लवकरात लवकर झाल्यास डॉक्टर्स काही उपचारात्मक हस्तक्षेपांची शिफारस करू शकतात, ज्यातून अशा गंभीर परिणामांना टाळता येऊ शकते.
लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या जून २०२३च्या एका अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार ८१ टक्के भारतीयांना हाई कोलेस्ट्रॉल त्रास आहे. धोक्याची सूचना देणाऱ्या या आकडेवारीतून एल डी एल सी वरील देखरेखीला सार्वजनिक आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये सर्वात पुढे ठेवण्याची तातडीची गरज व्यक्त होते.
फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान सांगतात, “एल डी एल सी ची पातळी अनेक वर्षे मूकपणे व बहुतेकदा कोणत्याही लक्षणांविना वाढत असते ही गोष्ट अनेक रुग्णांच्या लक्षात येत नाही व ती लक्षात येईतो खूप उशीर झालेला असतो. लिपिड प्रोफाइल नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे, कारण या समस्येचे निदान लवकर झाले तर गंभीर गुंतागूंती उद्भवण्याआधीच हस्तक्षेप करणे शक्य होते.
माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी २५ ते ३० टक्के रुग्णांना गैरसमजूतीमुळे किंवा जागरुकतेच्या अभावी कोलेस्ट्रोल व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करताना पाहिले आहे. लोकांनी ही चाचणी करून घ्यावी, आपल्यासाठी एल डी एल सी ची इप्सित पातळी किती असावी हे जाणून घ्यावे आणि उपचारांचे शिस्तीने पालन करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. त्यांनी आपल्या फिजिशियनची नियमित भेट घेतली पाहिजे व हा आजार बरा करण्यासाठी आपणहून पावले उचलली पाहिजेत. लिपिड चाचण्यांमुळे व्यक्तीची इप्सित पातळी समजू शकते आणि त्यावर योग्य उपचारपद्धती कोणत्या हे ठरवता येते.
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ने रुग्णांचे जोखीम गटांनुसार वर्गीकरण करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत. कमी धोका असलेल्या, फारशा गंभीर आरोग्य समस्या नसलेल्या व्यक्तींसाठी एल डी एल सी ची इप्सित पातळी १३० mg च्या खाली असली पाहिजे. अनेक प्रकारच्या धोकादायक समस्या असलेल्या किंवा दीर्घकाळापासून मधुमेहाचे रुग्ण असलेल्या व्यक्तींसह उच्च जोखीम गटात येणाऱ्या व्यक्तींसाठी एल डी एल सी ची पातळी ७० mgच्या खाली असली पाहिजे.
हृदयाचे आरोग्य जपणारी आहारपद्धती स्वीकारणे, नियमितपणे व्यायाम करणे आणि पुरेशी झोप मिळेल याची खबरदारी घेणे यांसारख्या जीवनशैलीतील सुधारणाही डिसलिपिडेमियाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनिवार्य आहेत. मात्र या उपाययोजनांना औषधोपचारांना पर्याय मानता कामा नये.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.