Chana Chaat Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Chana Chaat Recipe : पौष्टिकतेने परिपूर्ण चमचमीत पदार्थ खायचा आहे? तर चना चाट रेसिपी ट्राय करून पहा!

Chana Chaat : चना चाट या चमचमीत पदार्थचे केवळ नाव जरी घेतल तरी लोकांच्या तोंडला पाणी सुटते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Recipe Of Chana Chaat : चना चाट या चमचमीत पदार्थचे केवळ नाव जरी घेतल तरी लोकांच्या तोंडला पाणी सुटते. हा चवदार चना चाट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात चाटचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतात.

परंतु ते आरोग्याच्या (Health) दृष्टीने फारसे चांगले आणि बऱ्याच तेथील स्वच्छतेबद्दल मनात शंका असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी (Home) चविष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण चना चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

चना चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

भिजवलेले काळे चणे – 1 कप

हिरव्या मिरचीची पेस्ट – ½ टीस्पून

कांदा बारीक चिरलेला – ¼ कप

टोमॅटो चिरलेला – ¾ कप

कच्चा आंबा चिरलेला – ½ टीस्पून

उकडलेले बटाटे – ½ कप

कोथिंबीर – 2 चमचे

लाल तिखट – ¼ टीस्पून

लिंबाचा रस – 3-4 टीस्पून

गरम मसाला – ¼ टीस्पून

चाट मसाला – 2 टीस्पून

बटर – 2 टीस्पून

मीठ – चवीनुसार

चना चाट बनवण्याची पद्धत -

  • पौष्टिकतेने परिपूर्ण चना चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम काळे चणे घ्या आणि स्वच्छ धुवा.

  • त्यानंतर एका भांड्यात चणे घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

  • दुसऱ्या दिवशी चणे गाळून पाणी वेगळे करा.

  • आता प्रेशर कुकरमध्ये चणे टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवा आणि त्यानंतर गॅस बंद करा.

  • आता प्रेशर कुकरचा दाब आपोआप सुटण्याची प्रतीक्षा करा.

  • त्यानंतर कुकरमधून चणे एका वेगळ्या भांड्यात ठेवा.

  • आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा.

  • बटर वितळल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्या.

  • त्यानंतर पॅनमध्ये बारीक चिरलेले टोमॅटो मिरची पावडर चाट मसाला आणि गरम मसाला घालून टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा.

  • त्यानंतर पॅनमध्ये उकडलेले बटाटे आणि चणे घालून छान मिसळून घ्या.

  • बटाटे आणि चणे काही वेळ शिजवल्यानंतर त्यात हिरवी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.

  • आता हा चना चार्ट दोन ते तीन मिनिटे शिजू द्या आणि दरम्यान ढवळत रहा.

  • त्यानंतर गरमागरम चना चाट सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी येणार कोल्हापुरात

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

एक नंबर! आता कॉलसाठी नसणार SIMची गरज; भारतात पहिल्यांदा Satellite to Device सर्विस सुरू

रणबीर कपूरचे हे ७ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, यादीच आली समोर

SCROLL FOR NEXT