Gulkand Karanji Recipe : घरच्या घरी बनवा गुलकंद करंजी, पाहा रेसिपी

Recipe Of Gulkand Karanji : भारतामधील कोणतेही पकवान मिठाईशिवाय अपूर्ण आहे. महाराष्ट्रात करंजी ही प्रत्येक सणाला केला जाणारा पदार्थ आहे.
Gulkand Karanji Recipe
Gulkand Karanji Recipe Saam Tv

Gulkand Karanji Recipe : भारतामधील कोणतेही पकवान मिठाईशिवाय अपूर्ण आहे. महाराष्ट्रात करंजी ही प्रत्येक सणाला केला जाणारा पदार्थ आहे. इतर राज्यांमध्ये करंजीला साहित्य, पारीचा आकार वेगळा करत इतरही नावाने करंजी प्रसिद्ध आहे. गुजिया, चंद्रकला या पाकात बुडवून करतात.

आतल्या सारणानुसारही असंख्य प्रकार केले जातात. करंजीची पाती रवा किंवा मैद्याची बनवली जाते. अशातच आज आम्ही तुम्हाला गुलकंद करंजी बनवायची रेसीपी सांगणार आहोत. करंजी भारतातील (Indian) एक पारंपरिक डिश आहे. ही डिश चवीला अतिशय उत्कृष्ट असते.

Gulkand Karanji Recipe
Smoothie Recipe : दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवायची आहे? तर ट्राय करा बदाम केळी स्मूदी, पाहा रेसिपी

करंजी बनवण्याची सामग्री -

दोन कप पीठ, एक कप तूप, आवश्यकतेनुसार पाणी (Water), मावा - खवा दोन कप, गुलकंद 1 कप, दोन मोठे चमचे बडिशेप, सुखा नारळ दोन टेबस्पून, तळण्यासाठी तेल.

गुलकंद करंजी कशी बनवायची -

  • गुलकंद करंजी बनवन्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये पीठ घेऊन चांगल मळून घ्या.

  • त्यानंतर हे पीठ 20 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा.

  • त्यानंतर एका बाउलमध्ये बडिशेप, गुलकंद, नारळ, आणि मावा घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.

Gulkand Karanji Recipe
Chocolate Oats Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा चॉकलेट ओट्स, पाहा रेसिपी
  • त्यानंतर पुरी बनून करंजीच्या साच्यामध्ये ठेवून स्टफिंग भरून घ्या.

  • त्यानंतर साचा बंद करून चांगल प्रेस करून करंजी काढून घ्या.

  • अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या करंज्या बनवून घ्या.

  • मग कढईमध्ये तेल गरम करून सगळ्या करंजी मस्तपणे तळून घ्या.

  • तुमची गुलकंद करंजी तयार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com