Smoothie Recipe : दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवायची आहे? तर ट्राय करा बदाम केळी स्मूदी, पाहा रेसिपी

Recipe Of Smoothie : निरोगी जीवनशैलीसाठी सकाळचा हेल्दी नाश्ता करणे गरजेचे आहे.
Smoothie Recipe
Smoothie RecipeSaam Tv
Published On

Almond And Banana Smoothie : निरोगी जीवनशैलीसाठी सकाळचा हेल्दी नाश्ता करणे गरजेचे आहे. त्यामुळे केळी आणि बदाम यापासून सकाळचा हेल्दी नाश्ता तयार करा. हे दोन्ही खाद्यपदार्थ पौष्टिकतत्वांनी परिपूर्ण आहेत.

ज्यांना ऊर्जेचे पावर हाऊस म्हंटले जाते. म्हणून आज आम्ही तुम्हाला बदाम केळी स्मूदी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Smoothie Recipe
Chocolate Oats Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा चॉकलेट ओट्स, पाहा रेसिपी

बदाम केळी (Banana) स्मूदी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. चला तर मग जाणून घेऊया केळी आणि बदाम स्मूदी या स्वादिष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण रेसिपी बनवण्याची पद्धत.

बदाम केळी स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

केळीचे काप – 1 कप

सोललेले बदाम – 4/5

व्हॅनिला एसेन्स – ½ टीस्पून

कप थंड दूध (Milk) – 1½

खजूर बिया काढून – 2

बर्फाचे तुकडे (पर्यायी) – ¾

Smoothie Recipe
Healthy Recipe : चविष्ट पण आरोग्यदायी अशी हेल्दी डिश, पाहा रेसिपी

बदाम केळी स्मूदी बनवण्याची पद्धत -

  • बदाम केळी स्मूदी बनवण्यासाठी प्रथम बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बदाम सोलून बदामाचे तुकडे करून घ्या.

  • यानंतर खजूर मधील बिया वेगळया करून तुकडे करून घ्या यानंतर या सर्व गोष्टी मिक्सर जारमध्ये टाकून त्यात थंड दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण तयार करून घ्या.

  • हे मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा. आता ही तयार बदाम केळी स्मूदी एका भांड्यात काढून त्यात तीन-चार बर्फाचे तुकडे घाला आणि सर्व्हिंग क्लासमध्ये थंडगार सर्व्ह करा.

  • तुम्हाला आवश्यकता नसल्यास तुम्ही बर्फाचा वापर टाळू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com