Yogurt Side Effects Saam TV
लाईफस्टाईल

Yogurt Side Effects : उन्हाळ्यात दही खाताना 'या' चुका करू नका; फायद्याऐवजी नुकसान होईल

Avoid These Mistakes Consuming Dahi : कोणत्या पदार्थावर काय खावे हे त्यांना समजत नाही. यामुळे आरोग्यावर याचा उलट परिणाम होतो. आता तुम्ही उन्हाळ्यात दही खात असाल तर दही खाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

Ruchika Jadhav

राज्यात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून व्यक्ती काही ना काही उपाय करत आहेत. अनेकजण शरीर थंड ठेवण्यासाठी ताक, दही, लस्सी विविध सरबत याचे सेवन करतात. तुम्ही देखील उन्हापासून बचाव करताना या पदार्थांचे सेवन करत असाल.

उन्हाळ्यात विविध पदार्थ खाताना ते योग्य पद्धतीने खाल्ले पाहिजे. काही व्यक्ती खण्यापिण्याच्या गोष्टींकडे नीट लक्ष देत नाहीत. कोणत्या पदार्थावर काय खावे हे त्यांना समजत नाही. यामुळे आरोग्यावर याचा उलट परिणाम होतो. आता तुम्ही उन्हाळ्यात दही खात असाल तर दही खाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

काही व्यक्तींना खोकला, सर्दी, छातीत सतत कफ होणे अशा समस्या असतात. दही थंड आणि आंबट असल्याने याचा आपल्यावर उलट परिणाम होतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी आहारातून दही वगळावे किंवा खाणे टाळावे.

तुम्ही वजन कमी करत आहात तेव्हा देखील दही खाऊ नका. कारण दही हे फुल फॅट असलेल्या दुधापासून बनते. त्यामुळे यामध्ये देखील फॅट असते. असे दही खाल्ल्याने तुमचे वजन कमी होणार नाही उलट काही किलोने तुमचं वजन आणखी वाढेल.

तुम्हाला जेवण नीट पचात नसेल. पोट सतत खराब राहत असेल अशा व्यक्तींनी देखील दही खाऊ नये. दही खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या आणखी वाढू शकतात.

रात्रीच्यावेळी दही खाऊ नये. कारण दही आंबट असते. तसेच त्याने शरीरातील न्युकसचे प्रमाण वाढते. त्यामुळे रात्री झोपताना दही खाऊ नका.

तुम्हाला शुगर सारख्या समस्या असतील तर दहिमध्ये साखर मिक्स करून खाऊ नका. त्याने शुगर आणखी वाढते. या काही सिंपल टिप्स फॉलो केल्याने दही खाल्ल्यास होणाऱ्या नुकसानापासून तुमचा बचाव होईल.

टीप : ही एक सामान्य माहिती आहे. दहीचे सेवन करण्याबद्दल साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT