Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Saam Tv

घरात पालींचा वावर

उन्हाळ्यात कडक उन तर पावसाळ्यात जोरदार पाऊस असल्याने पाली आपल्या घरीच ठाण मांडून असतात.

HOW TO REMOVE LIZARDS FROM HOME | PINTREST

पाल होईल कायमची दूर

घराच्या भिंतींवर, बाथरूममध्ये, कपाटात जिकडे तिकडे पाली दिसतात. बहुतेक लोक पालीला घाबरतात आणि तिला पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. या काही ट्रिक्स केल्याने पाली घरातून कायमची दूर होतील.

HOW TO REMOVE LIZARDS FROM HOME | PINTREST

लॅव्हेंडरचे झाड

लॅव्हेंडरचा वास तीव्र आणि मनमोहक असतो. तो लहान किटक आणि काही प्राण्यांना आवडत नाहीत. प्राणी या वासापासून दूर पळतात. लॅव्हेंडरचे झाड छोटे असल्याने सहज गॅलरीत ठेवू शकता.

Lavender tree | PINTREST

रोझमेरी

रोझमेरी ही गु्णकारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. याचा वापर केसांच्या वाढीसाठी देखील केला जातो. रोझमेरीच्या तीव्र वासापासून प्राणी दूर पळतात.

Rosemary | PINTREST

पुदीना आणि तुळस

पुदिन्याचा सुगंध आणि तुळशीचा नैसर्गिक सुगंध अनेक लहान किटकांना दूर ठेवण्यास मदत करतो.

Mint and Holy Basil (Tulsi) | PINTREST

लेमनग्रास

लेमनग्रासचे तेल पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि भिंतीच्या कोपऱ्यांवर फवारा. कारण लेमनग्रासचा तीव्र उग्र वास पाली ,किटकांना आवडत नाही.

Lemongrass | PINTREST

फिनेलच्या गोळ्या (नॅफ्थलीनच्या गोळ्या)

कपाटात किंवा बाथरूममध्ये फिनेलच्या गोळ्या ठेवल्याने कपड्यांनाही फ्रेश वास येतो आणि पाली देखील कपाटात फिरकत नाहीत.

naphthalene balls | PINTREST

कॉफी आणि तंबाखूचे गोळे

ज्या कोपऱ्यात पाली येतात तिथे कॉफी आणि तंबाखूच्या छोटया गोळ्या करून ठेवल्याने पालींचा वावर कमी होण्यास मदत होईल.

Coffee and tobacco balls | PINTREST

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

FITNESS TIPS | CHATGPT
येथे क्लिक करा