Cholesterol Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Cholesterol News : सकाळी उठल्यावर 'या' पदार्थांचे सेवन करा; कॉलेस्ट्रॉल होईल गायब

Cholesterol Level In Control : सध्या अगदी तरुण मुलं देखील हाय कॉलेस्ट्रॉलचे शिकारी होताना दिसत आहेत. त्यामुळे आज कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये कसं आणायचं या बाबत जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कॉलेस्ट्रॉल असते. मात्र याचे प्रमाण आपल्याला निरोगी ठेवू शकते. जर शरीरात जास्त कॉलेस्ट्रॉल वाढले तर आरोग्याशी संबंधित विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे चक्कर येणे, सतत थकवा जाणवणे हे त्रास सुरुवातीला दिसतात. कॉलेस्ट्रॉल आपल्या शररातील रक्त वाहिन्या ब्लॉक करते. यामुळे काही काळाने हृदयविकाराच्या समस्या देखील जाणवतात.

कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. कारण सध्या अगदी तरुण मुलं देखील हाय कॉलेस्ट्रॉलचे शिकारी होताना दिसत आहेत. त्यामुळे आज कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये कसं आणायचं या बाबत जाणून घेऊ.

योग्य नाश्ता

अनेक व्यक्ती सकाळी नाश्ता करत नाहीत. किंवा काहीजण सकाळी सकाळी तळलेले तेलकट पदार्थ खातात. यामध्ये फायबर योग्य प्रमाणात नसते. शरीरात योग्य प्रमाणात फायबर असल्यास कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात धान्य, पाले भाज्या अशा गोष्टींचा समावेश करा.

कोमट पाणी

सकाळी उठल्यावर रोज कोमट पाण्यात लिंबू पिळून त्याचे सेवन करा. याने तुमचे पोट साफ होण्यास मदत होते. तसेच शरीरातील कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. लिंबूमध्ये असलेले पोषक घटक कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात.

ग्रीन टी

ज्या व्यक्तींना हाय कॉलेस्ट्रॉल आहे त्यांनी सकाळी उठल्यावर ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. यामध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सीडंट असते. अँटी ऑक्सीडंट कॉलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे तुम्ही देखील आहारात ग्रीन टीचा समावेश करू शकता.

चालणे

चालणे म्हणजेच एक व्यायाम आहे. हा व्यायाम केल्याने शरीराची झीज होते. वजन वाढत नाही शिवाय कॉलेस्ट्रॉल कमी होते. तुम्ही चालण्या व्यतिरिक्त सायकलिंग देखील करू शकता.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : मित्र की गुप्त शत्रू? जाणून घ्या कुंभ राशीचे आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे भव्य चिंतन शिबिर, ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

Maharashtra : ७ महिन्यात १४ लाख मतदार वाढले, विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपादरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर; VIDEO

SCROLL FOR NEXT