Cholesterol Levels : हाय कोलेस्ट्रॉलमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक;आजपासूनच आहारात या पदार्थांचा समावेश करा

High Cholesterol Heart Attack Risk Calculator : कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यानंतर हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. त्यामुळे अशा त्रासापासून वाचण्यासाठी आहारात आजपासूनच काही ठरावीक पदार्थांचा समावेश आवर्जुन केला पाहिजे.
Cholesterol  Levels
Cholesterol LevelsSaam TV

घरचं जेवण सध्याच्या तरुण पिढीला नकोसं झालं आहे. सर्वजण बाहेर स्ट्रीट फूड किंवा चमचमीत पदार्थ खाणे पसंत करतात. महिन्याभरातून कधितरी असे पदार्थ खाल्ल्यास ठिक आहे. मात्र काही व्यक्ती वारंवार याच पदार्थांचं सेवन करतात. सुरुवातीला जीभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ काही वेळाने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.

Cholesterol  Levels
Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

काही व्यक्तींचं कामाचं शेड्युल देखील फार व्यस्त असतं. त्यामुळे घरी जेवण बनवण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे ते बाहेरचे बर्गर आणि पिझ्झा खाणे पसंत करतात. याने शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढत जाते. कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यानंतर हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. त्यामुळे अशा त्रासापासून वाचण्यासाठी आहारात आजपासूनच काही ठरावीक पदार्थांचा समावेश आवर्जुन केला पाहिजे.

आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमीन सी, मिनरल्स आणि अॅमिनो अॅसीड असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आवळ्यामधील पोषक तत्व आपल्या शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यातील अँटीऑक्सीडेंट आपल्या हृदयाचे संरक्षण करते. त्याने हार्टअटॅक येण्याच्या समस्या पूर्णता कमी होतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये पॉलीफेनोल असते. पॉलीफेनोलमुळे शरीरातील बॅड कोलेट्रॉल कमी होऊ लागते. तसेच गुड कोलेट्रॉल वाढत जाते.

लिंबू

लिंबूमध्ये सर्वाधिक जास्ता व्हिटॅमीन सी असते. यातील अँटीऑक्सीडेंट शरीरातील टॉक्सीन आणि बाहेर काढते. तसेच अतिरिक्ता चरबी देखील कमी करते. लिंबूमध्ये हेस्परिडिन नावाचा एक द्रव पदार्थ आहे. त्यामुळे देखील कोलेस्ट्रॉल कमी होतं.

पालक

पालक तसेच अन्य पाले भाज्यांचे अनेक व्यक्ती सेवन करत नाहीत. त्यांची चव बऱ्याच जणांना आवडत नाही. मात्र आहारात पालकसह अन्य पालेभाज्या असणे गरजेचं आहे. त्यामध्ये मिनरल्स असल्याने हृदयविकाराच्या समस्यांपासून आपलं संरक्षण होतं.

Cholesterol  Levels
Beed Crime: बीडमध्ये तब्बल २ कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com