Cholesterol Drink : वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका! रोज सकाळी प्या हे हेल्दी ड्रिंक्स, मिळेल आराम

Cholesterol Side Effects : कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्यासाठी अधिक घातक समजले जाते. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक व इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.
Cholesterol Drink
Cholesterol DrinkSaam Tv
Published On

Morning Drink :

रक्तातील कोलेस्ट्रॉल अचानक वाढल्याने आपल्याला त्रास होतो. ज्यामुळे आपण गंभीर आजारांना बळी पडतो. कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्यासाठी अधिक घातक समजले जाते. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक व इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

हल्ली वाढत्या कोलेस्ट्रॉलचा सामना अनेकांना करावा लागतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल असणे गरजेचे आहे. कारण यामध्ये हार्मोन्स आणि पेशी तयार करण्याचे घटक असतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खराब कोलेस्ट्रॉल आपल्या हृदयासाठी अधिक घातक असते. ज्यामुळे मेंदूच्या नसांमध्ये रक्त गोठते, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात करण्यासाठी या हेल्दी ड्रिंक्सची मदत होईल.

Cholesterol Drink
Winter Heart Care : हिवाळ्यात वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका? हृदयविकाराच्या झटक्यापासून कसा कराल बचाव

1. आले, लिंबाचा रस आणि पाणी

सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर कोमट पाण्यात (Water) लिंबाचा रस, चमचाभर आल्याचा रस मिसळून प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहाते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

2. हळदीचे दूध

सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर दूधात (Milk) हळदी पावडर मिसळून प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहाते.

Cholesterol Drink
Kolhapur Travel Places: पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गात हरवून जायचंय; कोल्हापूरमधील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

3. मध,लसूण आणि पाणी

ग्लास कोमट पाण्यात तीन पाकळ्या लसणाची पेस्ट आणि एक चमचा मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते.

4. टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रसमध्ये फायबर आणि लाइकोपीने भरपूर असल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com