Milk For Low Blood Pressure Saam TV
लाईफस्टाईल

Drink For Low BP: अचानक रक्तदाब कमी होऊन चक्कर आली? प्या 'हे' पेय, लवकर मिळेल आराम

Cold Milk Benefits in Marathi: आजकाल लहान मुलांना देखील ब्लड प्रेशरचा त्रास असतो. अशात जर अचानक रक्तदाब कमी होऊन चक्कर आली तर घरी उपलब्ध असलेले थंड दूध प्यावे. यामुळे काही वेळात रक्तदाब नियंत्रणात येतो.

Shreya Maskar

दूध हा पोषक घटकांचा खजिना आहे. मात्र थंड दूध प्यायल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात. कारण थंड दुधामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटामिन्स चे प्रमाण जास्त असते. यामुळे आपले हृदयाचे आरोग्य सुरळीत राहते.

थंड दूध पिण्याचे फायदे

ब्लड प्रेशर नियंत्रणात

अचानक ब्लड प्रेशर कमी होऊन चक्कर आल्यास घरी उपलब्ध असलेले थंड गोड दूध प्यावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. दुधामध्ये साखर टाकल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी ब्लड प्रेशर नियंत्रणास राहण्यास मदत होते. थंड दुधातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. तसेच यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.

मूड रिफ्रेश

थंड दुधामधील पोषक घटक आपला मूड रिफ्रेश करण्यास मदत करतात. दुधामुळे आपल्या स्नायूंचे आरोग्य सुधारते. आपल्याला कमी वेळात ताजेतवाने वाटते.

पोटाचे आरोग्य सुधारते

थंड दूध प्यायल्याने पोटासंबंधित समस्या दूर होतात. उदा. बद्धकोष्ठता, ॲसिडीटी. तोंडाच्या अल्सरवर थंड दूध प्यायल्याने आराम मिळतो. हिरड्यांमधून रक्त येत असल्यास थंड दूध प्यावे.

वजन नियंत्रणात राहते

थंड दुधामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. थंड दुधामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

त्वचेचे आरोग्य

थंड दूध प्यायल्याने शरीर हायड्रेट राहून त्वचा तजेलदार दिसते. चेहऱ्यावरील पिपंल्स, काळे डाग कमी होण्यास मदत मिळते. कोरड्या त्वचेसाठी थंड दूध रामबाण उपाय आहे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT