Papaya Health Benefits
Papaya Health BenefitsSAAM TV

Health Benefits : रिकाम्या पोटी 'या' फळाचे सेवन करा, पावसाळ्यात आजारांपासून राहाल दूर

Papaya Health Benefits : पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. नियमित सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन पावसाळ्यात आजारांपासून लढण्याची ताकद देतात.
Published on

पपई गरम फळ असल्यामुळे अनेक लोक याचे सेवन करत नाहीत. पण पपईमुळे पावसाळ्यात शरीराला ऊब मिळते. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानेव शरीराला असंख्य फायदे मिळतात. पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून आपले संरक्षण होते. पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.

त्वचेचे आरोग्य

सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते. तसेच पिंपल्सची संख्या कमी होते. पपईमधील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. त्वचेच्या पेशी दुरुस्त करून त्वचा हायड्रेट ठेवते.

हृदयाचे आरोग्य

अनेकांना हृदयविकाराचा त्रास असतो. अशा लोकांनी नियमित उपाशीपोटी पपईचे सेवन करावे. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. पपईमधील पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. ज्यामुळे संसर्गाचा धोका टळतो. पपईमधील कॅल्शियम हाडे मजबूत करतात. तसेच सांधे दुखीवरही आराम मिळतो.

वजन कमी

पपईमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे नियमित पपई सकाळी खावी.

Papaya Health Benefits
Pomegranate Face Pack: चेहऱ्याला लावा लाल फळांचा फेसपॅक, त्वचेवर येईल ग्लो

पचनक्रिया सुरळीत

पपईमधील फायबर आणि अँटिऑक्सिडेंट गुणर्धम आपले पचन सुरळीत करते. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारते. ॲसिडीटीची समस्या उद्भवत नाही.

मधुमेह

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास पपई रामबाण उपाय आहे. मधुमेहाच्या लोकांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करावे. पपईमुळे शरीरातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.

शरीराला डिटॉक्स

सकाळी शरीराला डिटॉक्स केल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे आणि फळांचे रस प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने पावसाळ्यात शरीराच्या अनेक समस्यांपासून आपले संरक्षण होते. दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Papaya Health Benefits
Shravan 2024 : श्रावणातील उपवासाला 'हा' फलाहार करा, थकवा अन् ॲसिडीटी होईल दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com