Coconut Water Can Be Risky for These People – Know the Health Warnings Freepik
लाईफस्टाईल

Coconut Water : या लोकांसाठी नारळाचे पाणी ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या सविस्तर माहिती

Coconut Water Can Be Risky for These People : नारळपाणी आरोग्यदायी मानलं जातं, पण काहींसाठी ते धोकादायक ठरू शकतं. मूत्रपिंड, मधुमेह किंवा हृदयाच्या रुग्णांनी खबरदारी घ्यावी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नारळपाणी एक नैसर्गिक सुपरड्रिंक आहे. नारळाचे पाणी पिल्याने शरीर नैसर्गिकरित्या हायड्रेट राहते, पचन सुधारते आणि ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. रुग्णाला ऊर्जा मिळावी यासाठी डॉक्टर सुद्धा नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पण तुम्हाला माहित आहे का? नारळाचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी असले तरी ते सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरत नाही. काही लोकांसाठी ते धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया.

नारळाच्या पाण्यात साधारणपणे प्रति २०० मिली सर्व्हिंगमध्ये सुमारे ६-७ ग्रॅम साखर असते. साखरेचे हे प्रमाण फळांचा रस किंवा सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असलेल्या साखरेपेक्षा कमी असले तरी, ती रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम करू शकते. म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांनी नारळाचे पाणी पिणे टाळावे. शिवाय नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशिम असते. हे एक असे खनिजे आहे जे हृदयाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु आधीपासुन किडनीचे आजार असणाऱ्या लोकांसाठी जास्त पोटॅशियमचे सेवन धोकादायक ठरू शकते.

नारळाचे पाणी थंड गुणधर्माचे असते. जे शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देते. ते उष्ण हवामान किंवा उन्हाळ्यात फायदेशीर असले तरी, सर्दि किंवा खोकला असल्यास नारळाचे पाणी समस्या निर्माण करू शकते. तसेच जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल. आणि तुम्ही ACE इनहिबिटर किंवा पोटॅशियम-सेव्हिंग डाययुरेटिक्स सारखी पोटॅशियम राखून ठेवणारी औषधे घेत असाल. तर त्यावर नारळ पाणी पिल्याने शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढून छातीत दुखणे, मळमळणे, स्नायू कमकुवत होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडून कमी पोटॅशियम किंवा इलेक्ट्रोलाइट्स असलेला आहार घेण्याचा सल्ला मिळाला असेल. तर नारळपाणी तुमच्यासाठी योग्य पेय ठरत नाही. नारळ पाण्यातील पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमचे मिश्रण तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडवू शकते. आणि थकवा येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे तसेच हृदयाची असामान्य लय अशी लक्षणे दिसू लागतात. यामुळे केव्हाही नारळपाणी पिण्याआधी तुमच्या डॉक्टरांनी किंवा आहारतज्ञांनी ठरवलेल्या आहार मार्गदर्शकाचे पालन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT