Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips: खोबरेल तेल की नारळाचे दूध, लांब केसांसाठी फायदेशीर काय ?

OiL For Healthy Hairs: सध्याच्या काळात केसांच्या निगडित समस्यामध्ये वाढ झालेली दिसन येते. त्यात जर तुम्ही नारळाचे तेल किंवा नारळाचे दूध केसांसाठी वापरल्यास केस चांगले होण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घनदाट केसांसाठी बाजारात अनेक महागडे प्रोडक्ट्स मिळतात. जर तुम्ही ही जर बाजारात मिळणारे प्रोडक्ट्स सातत्याने केसांच्या समस्येसाठी वापरत असाल तर त्यामध्ये आता बदल करण्याची खूप गरज आहे. केसांचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी सध्या महिलांपासून ते पुरुष वर्ग बाजारात मिळणारे रासायनिक प्रोडक्ट्स वापरतात,तर दुसरीकडे काहीजण घरगुती उपायांची मदत घेतात.

केसांची काळजी संबंधित विचार केल्यास पहिल्यांदा तर नारळ तेलाचा विचार मनात येतो. आपल्यापैंकी प्रत्येकजण नारळाच्या तेलानेच केसांची डोक्याची मालिश सातत्याने करत आला आहे. हे तेल तुमच्या केसांना अगदी मुळापासून कंडिशन करते आणि त्यांचे पोषण राखण्यास मदत करते. पण तुम्ही आठवड्यातुन दोनदा तरी नारळाचे तेल सोडून नारळाच्या दुधापासून बनवलेला हेअर मास्क देखील वापरु शकता. मात्र यावरुन अनेकांच्या मनात प्रश्न आला असले तो की, निरोगी केसांसाठी खोबरेल तेल चांगले किंवा नारळाचे दूध(Milk) चांगले. चला तर या बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

सध्याच्या तरुण पढीतील तरुण मुली किंवा मुलांना केसांना तेल लावायला आवडत नाही, अशा वेळी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नारळाच्या दुधापासून तयार केलेला हेअर मास्क लावू शकता. नारळाच्या दुधामध्ये असलेले फॅटी अॅसिड केसांना पोषण पुरवतात. मात्र, बऱ्याचदा प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रश्न पडतो की लांब आणि घनदाट केसांसाठी खोबरेल तेल लावयचे की नारळाचे दूध. चला तर पाहूयात खोबरेल तेल(coconut-oil) तसेच नारळाचे दूध केसांना लावण्याचे फायदे.

केसांना खोबरेल तेल लावण्याचे फायदे

१- जेव्हा तुम्ही केसांना खोबरेल तेल लावता तेव्हा ते केसांना मुळापासून चांगले ठेवण्यास मदत करते. यामुळे कोरड्या केसांसाठी तसेच खराब आणि निस्तेज केसांसाठी खोबरेल तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

२- खोबरेल तेलात लॉरिक अॅसिड तसेच व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन(vitamin) क शिवाय लोह भरपूर प्रमाणात असते,ज्यामुळे केसांना पोषण मिळते.

३- खोबरेल तेलात मोठ्या प्रमाणात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात ज्यामुळ केसांतील कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

४- जर तुम्ही केसांसाठी हीट स्टाइलिंग टूल्स वापर असाल तर त्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरु शकता. यामुळे केस खराब होण्यापासून बाचवले जातात.

केसांना नारळाचे दूध लावल्याने कोणते फायदे होतात

१- जर तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना नारळाचे दूध लावल्यास केस हायड्रेट राहण्यास मदत होते.

२- कोरड्या केसांसाठी(Hairs) नारळाचे दूध चांगले समजले जाते. त्यासाठी आठवड्यातून एकदा नारळाच्या दुधाने हेअर मास्क तयार करु शकता.

३- नारळाच्या दुधात व्हिटॅमिन सी आणि इ तसेच व्हिटॅमिन बी-१ , बी-३ असे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे केस मुलायम आणि निरोगी होण्यास मदत होते.

४- केस निरोगी राहण्यासाठी नारळाचे दूध फायदेशीर ठरते. शिवाय केसांच्या वाढीसाठी मदत होते.

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato : टोमॅटोच्या बिया खाव्यात की नाही? वाचा फायदे-तोटे

Pune News: सैराट स्टाईल हल्ला, पतीला मारहाण तर पत्नीचे...; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं|VIDEO

Amravati Crime : महिला पोलीस हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरणातून पतीचे कटकारस्थान, दोन 'सुपारी किलर' अटकेत

Maharashtra Politics : शिवसेनेचा मीच बाप, भाजप आमदाराच्या विधानाने महायुतीत तणाव, शिंदेंसेनेचा २४ तासांचा अल्टीमेटम

लहान मुलांना कोणत्या वयापासून साखर खाण्यास दिली पाहिजे?

SCROLL FOR NEXT