ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक महिलेला आपले केस लांब आणि दाट असावे असे वाटते. लांब आणि दाट केसांसाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
कडुलिंबाच्या पानांचा वापर करुन तुमचे केस दाट आणि लांब होतील.
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. हे केसांसाठी फायदेशीर असते.
कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे.
गरम पाण्यात कडुलिंबाची पाने टाका. हे पाणी काही वेळ चांगले उकळून घ्या.
उकळलेले पाणी थंड झाल्यावर तुमच्या केसांना लावा. नंतर केस धुवून झाल्यावर केसांवर कडुलिंबाचे पाणी टाका.
कडुलिंबाचे पाणी टाकल्यावर केस टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.
यामुळे डोक्याला येणारी खाज येत नाही. याशिवाय कोंडादेखील कमी होतो.
कडुलिंबाच्या पाण्याने केस धुतल्यास केस गळतीपासून आराम मिळतो.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.