Health SAAM
लाईफस्टाईल

Health: ऑपरेशनशिवाय रक्तवाहिन्या होतील साफ, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' ५ पानांचं करा सेवन

blood and blood vessels: सध्या लोक कोणत्याही आजारावर सरळ शस्रक्रिया करतात, ते आयुर्वेदीक गोष्टींचा वापर करत नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धावपळीच्या व्यस्त जीवनात खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे कठीण झाले आहे. या जीवनशैलीमुळे उच्च कोलेस्ट्रोल ही एक सामान्य समस्या बनली आहे. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

आयुर्वेदामध्ये शस्त्रक्रिया किंवा औषधांशिवाय या समस्येवर उपचार शक्य आहे. आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पती आणि पानांचा समावेश असतो. या पानांच्या आधारे रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 आयुर्वेदिक पानांबद्दल सांगणार आहोत, जे रक्तवाहिन्यांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

तुळशीची पाने

हजारो वर्षांपासून आयुर्वेदात तुळशीचा वापर केला जात आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुळशीची पाने खूप गुणकारी आहेत. या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखतात आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात. तुळशीच्या पानांचा रस किंवा पान चावून खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो.

पुदिना

पुदिना केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर रक्त शुद्ध करण्याचेही काम करते. पुदिन्याच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी पुदिना फायदेशीर ठरतो. दररोज पुदिन्याचा चहा किंवा पानांचा रस घेतल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते.

गुळवेल

गुळवेल हिला अमृतवेल म्हणतात. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात. गुळवेलचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमधील साचलेले अवशेष साफ होतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. याची पावडर सुद्धा बाजारामध्ये सहज उपलब्ध असते.

कढीपत्ता

कढीपत्त्याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यांचे सेवन शरीरातील अनेक प्रकारच्या रोगांवर फायदेशीर मानले जाते. कढीपत्त्यात जास्त प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात. कढीपत्त्याच्या सेवनाने रक्तातील साचलेली चरबी कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. तुम्ही कढीपत्ता उकळवून किंवा चहामध्ये घालून सेवन करू शकता.

कडुलिंबाच्या झाडाची पाने

कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे शरीर शुद्ध करण्यास मदत करतात. कडुनिंबाच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि रक्तवाहिन्यांमधील रक्तसंचयची समस्या दूर होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT